Nashik News: शिवपुराण कथावाचक पंडित प्रदिप मिश्रा यांनी केला श्री कपालेश्वर महादेवास जलाभिषेक

Shivpuran Narrator Pandit Pradip Mishra Performed Jalabhishek to Shri Kapaleshwar Mahadev
Shivpuran Narrator Pandit Pradip Mishra Performed Jalabhishek to Shri Kapaleshwar Mahadevesakal
Updated on

पंचवटी : गोदाघाटावरील रामकुंड परिसर येथे महादेवाच्या पिंडीसमोर नंदी नसलेले जगप्रसिद्ध असे श्री कपालेश्वर महादेव मंदिर आहे.

गुरूवारी (ता.२३) रोजी रात्री शिवपुराण कथावाचक पंडित प्रदिप मिश्रा यांनी भेट देत श्री कपालेश्वर महादेवास पुजारी व गुरवांच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात जलाभिषेक केला.

यावेळी पुजारी सतिश शुल्क, अमोल थेटे तर कपालेश्वर मंदिराचे गुरव पुजारी हेमंत गाडे, आदीनाथ गाडे, अतुल शेवाळे उपस्थित होते. (Shivpuran Narrator Pandit Pradip Mishra Performed Jalabhishek to Shri Kapaleshwar Mahadev Nashik News)

Shivpuran Narrator Pandit Pradip Mishra Performed Jalabhishek to Shri Kapaleshwar Mahadev
Maha Shiv Puran Katha: देवाच्या नामस्मरणासाठी वेळ काढ : पंडित प्रदीप मिश्रा

पंडित प्रदिप मिश्रा यांनी गुरूवारी (ता.२३) रोजी पहाटे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात तर रात्री श्री कपालेश्वर महादेव मंदिर येथे दर्शनासाठी येत विविध पूजा अर्चा करत मंत्रोच्चारात जलाभिषेक केला. पंडित मिश्रा यांचा आशिर्वाद घेण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी संपूर्ण रामकुंड परिसर महादेवाच्या जयघोषाणे दुमदुमून गेला होता. श्री कपालेश्वर महादेव मंदिरास भेट दिल्यानंतर पंडित मिश्रा यांचा ट्रस्टच्यावतीने शाल व कपालेश्वर महादेवाची फोटोफ्रेम देत सत्कार करण्यात आला.

यावेळी विश्वस्त रावसाहेब कोशिरे, ॲड. अक्षय कलंत्री, प्रशांत जाधव, श्रद्धा दुसाने कोतवाल, सुनील पटेल आदींसह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shivpuran Narrator Pandit Pradip Mishra Performed Jalabhishek to Shri Kapaleshwar Mahadev
Maha Shiv Puran Katha: मतांच्या राजकारणासाठी संस्कृतीचे विभाजन : पंडित प्रदीप मिश्रा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.