नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा गोदावरी बँकेच्या अध्यक्षा अमृता पवार यांनी आज मुंबईत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप याही भाजप प्रवेशकर्त्या झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, सुरेशबाबा पाटील, आमदार ॲड्. राहुल ढिकले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदी उपस्थित होते. (Shock to NCP Amrita Pawar join BJP nashik political news)
माजी खासदार डॉ. वसंतराव पवार आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमामाताई पवार यांच्या कन्या वास्तूविशारद अमृता यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागामध्ये भाजपला बळ मिळणार आहे. अमृता यांनी देवगाव (ता. निफाड) गटातून जि.प. निवडणूक जिंकली होती. त्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय मानल्या जात होत्या.
श्री. घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशामुळे मतदारसंघातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून उमेदवारीसाठी महिला इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यात आता तनुजा घोलप यांची भर पडली आहे.
पक्षाला फायदा होईल
अमृता पवार या पक्षामध्ये अगोदर आल्या असत्या, तर वेगळे चित्र पाहावयास मिळाले असते, असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, की आता अमृता पवारांच्या पक्ष प्रवेशामुळे मला आनंद झाला आहे. त्यांच्या प्रवेशाचा फायदा नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात पक्षाला होईल. ....
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
विधानसभा की लोकसभा
अमृता पवार या लोकसभा की विधानसभा निवडणूक लढवणार याबद्दल तर्कवितर्क लढवण्यास सुरवात झाली.
त्यांचा देवगाव गट येवला विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याने त्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात की (कै) वसंतराव पवार समर्थकांसह भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या अनुषंगाने निफाड विधानसभा मतदारसंघातून आमदार दिलीप बनकर यांच्या विरोधात निवडणूक लढवणार यासंबंधीचे आडाखे जिल्ह्याच्या राजकारणात बांधण्यास सुरवात झाली आहे.
त्याचवेळी नाशिक लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष त्यांच्या उमेदवारीचा आगामी निवडणुकीत विचार करणार काय? यासंबंधाने चर्चेला उधाण फुटले आहे.
"डॉ. वसंतराव पवार यांनी नाशिकमध्ये ज्या पक्षाची स्थापना केली, त्या पक्षातून बाहेर पडत सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तळागाळातील लोकांसाठी निःस्वार्थी वृत्तीने काम करत आहेत. मला हे काम पुढे न्यायचे आहे."
- अमृता पवार, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या)
"कन्येच्या प्रवेशाची अजून मला कल्पना नाही. मी माहिती घेऊन प्रतिक्रिया देणे उचित ठरेल. दोन दिवस दिल्लीत होतो. त्यामुळे मला आजच बातमी समजली."
- बबनराव घोलप (माजी मंत्री)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.