Nashik Fire Accident: चांदवडला माथेफिरूंकडून दुकानांना आग; फ्रिज दुरुस्तीसह कटलरी दुकानांचे लाखांचे नुकसान

दुकानमालक अदनान मतिन शेख यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता टपरी आगीच्या भक्षस्थानी पडली होती.
shop on fire in chandwad nashik fire accident news
shop on fire in chandwad nashik fire accident news
Updated on

Nashik Fire Accident: येथील आठवडे बाजार तळातील काद्री सरकार रेफ्रिजरेशन व आकाश लेडीज शॉपी या दोन दुकानांना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागून फ्रिजचे साहित्य व कॉस्मेटिक साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. भाजी मंडईशेजारी टपऱ्यांमध्ये ही दुकाने आहेत.

यातील काद्री सरकार रेफ्रिजरेशन या फ्रीज विक्री, दुरुस्तीच्या दुकानास बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास आग लागली. (shop on fire in chandwad nashik fire accident news)

या दुकानांना रात्री एकच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांकडून फ्रिजच्या दुकानाच्या मागच्या बाजूने पत्र उचकटून ज्वलनशील पदार्थ टाकून दुकान पेटवून देण्यात आल्याचे घटनास्थळावरून दिसते. शेजारील आकाश लेडीज शॉपी या कटलरी दुकानाला देखील आग लागल्याने दोन्ही दुकानांमधील बारा ते पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

आग कुणी लावली अथवा कशामुळे लागली याची माहिती अजून मिळू शकली नाही, परंतु फ्रिज रिपेरिंग दुकानाचे दहा ते बारा लाखाचे नुकसान झाले असून कटलरी दुकानाचे तीन ते साडेतीन लाखाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. दुकानमालक अदनान मतिन शेख यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता टपरी आगीच्या भक्षस्थानी पडली होती.

shop on fire in chandwad nashik fire accident news
Nashik Fire Accident: माळेदुमाळा येथे आग लागून घरासह धान्य व साहित्याचे नुकसान

मंगरूळ टोलनाक्यावरील सोमा कंपनीच्या अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत दुकानातील फ्रीज, वॉशिंग मशिन, मशिनरी, ओव्हन, कूलर, स्पेअरपार्ट आदी साहित्याचे अंदाजे १० ते १२ लाखांचे नुकसान झाले.

या घटनेत बाजूला असलेल्या आकाश लेडीज शॉपी या सौंदर्यप्रसाधने विक्रीच्या दुकानासही आग लागून दुकानातील कॉस्मेटिक साहित्य, कटलरी, साड्या, शिलाई मशिनरी, सौंदर्यप्रसाधनाच्या साहित्याचे अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाले. ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याचा संशय दुकानमालक अदनान शेख यांनी व्यक्त केला आहे. याबाबत चांदवड पोलिस ठाण्यात आगीची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून तक्रार दाखल करून घेतली आहे.

shop on fire in chandwad nashik fire accident news
Nashik Fire Accident: सटाण्याच्या चौगांव बर्डीवर 2 घरांना आग; 6 लाखांहून अधिक नुकसान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.