Nashik Crime : अंदरसूलला महिलेला चकवा देत 5 तोळे सोनपोत लंपास

chain snatching latest crime news
chain snatching latest crime newsesakal
Updated on

अंदरसुल (जि. नाशिक) : येथील बस स्थानक परिसरातील नाशिक औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या यश किराणा दुकानदार महिलेस अज्ञात भामट्याने हातचलाखीने सुमारे पाच तोळ्याच्या सोन्याची पोत घेऊन पोबारा केल्याची घटना शुक्रवारी (ता.२०) सकाळच्या सुमारास घडल्याने परिसरात खळबळ उडाली. यात दुकानदार महिलेचा लाखोंचा ऐवज चोरीस गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. (shop owner women gold chain snatched by thief at andarsul nashik crime news)

सकाळी साडे नऊच्या सुमारास ग्राहक बनून आलेल्या अज्ञात ठगाने महिला दुकानदार मधुमती रवींद्र शिंदे (वय ४९ ) यांच्याकडून दोन बिस्कीट पुड्याची खरेदी केली. दरम्यान, मला नवीन सराफाची दुकान टाकायची आहे. त्यासाठी प्लॅस्टिक पिशवीतील फुले व तेराशे रुपये कोणत्याही मंदिरात दान करायचे आहे.

जवळपास मंदिर आहे का अशी विचारणा केली त्यावर दुकानदार महिलेने जवळपास मंदिर नसून गावात असल्याचे सांगितल्यानंतर अज्ञात ठगाने दान करण्याचा बनाव रचत तुम्हीच दान करा, फक्त माझ्याकडील फुलं व पैशांना तुमच्या गळ्यातील सोन्याचा स्पर्श करून तुमच्या काउंटर ड्रॉपमध्ये (गल्ल्यात) ठेवा व दहा मिनिटाने तुमच्या सोन्याच्या पोत पिशवीतून काढून घ्या, असे सांगून हात चलाखीने अडीच तोळे, गोल मण्याची एकदानी व दुसरी पदक असलेली सोन्याची पोत लुबाडून पोबारा केला.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

chain snatching latest crime news
Shivputra Sambhaji Mahanatya :.. क्षणात थकवा दूर होऊन काळीज भरून येते : डॉ. कोल्हे यांची भावना

सदर भामटा गेल्यानंतर महिलेने पिशवी उघडून पाहिली असता, दागिने नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आरडाओरड सुरू केली. मात्र, तोपर्यंत पाच तोळे सोने लुबाडून महिला फरार झाली. सौ. शिंदे यांनी येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस उपनिरीक्षक भिसे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ही चेक केले असून पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे, किरण पवार आदी पुढील तपास करीत आहेत.

chain snatching latest crime news
Nashik News : कांदा लागवडीत आडजी-पडजी पद्धतीचा वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.