Nashik: शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला अल्प प्रतिसाद! जिल्ह्यात संघर्ष समितीच्या बाजारबंद असहकार आंदोलनाला सुरवात

कांदा निर्यातबंदीच्या विरोधात राज्यातील शेतकरी संघटनांच्या असहकार आंदोलनास सोमवार (ता. ८)पासून सुरवात झाली
Protest
Protestesakal
Updated on

नाशिक : कांदा निर्यातबंदीच्या विरोधात राज्यातील शेतकरी संघटनांच्या असहकार आंदोलनास सोमवार (ता. ८)पासून सुरवात झाली. मात्र या आंदोलनाला जिल्ह्यातील बाजार समितीकडून अल्प प्रतिसाद मिळाला. (Short response to movement of farmers organizations Sangharsh Samiti Bazar And non cooperation movement started in district Nashik)

संकटांशी सामना करून प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी लढत आहे. मात्र शेतमालाला भाव नाही. नुकसान होऊन आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होताच केंद्र सरकार दरात हस्तक्षेप करते. त्यामुळे सरकारच्या निर्यातबंदीच्या विरोधात शेतकरी संघटनांनी वज्रमूठ केली.

त्यासाठी समविचारी शेतकरी संघटनांनी गत आठवड्यात एकत्र येत शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली. त्यांनी ‘सरकारची निर्यातबंदी तर आमची शेतमाल बाजारबंदी’, अशी घोषणा केली होती.

त्यानुसार थेट बांधावरून सोमवारी हे आंदोलन सुरू झाले आहे. त्यानुसार शेतमाल, दूध व शेती उत्पादने विक्रीसाठी बाजारात न नेण्याचा संकल्प करून कामकाज सुरू झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी गावागावात भूमिका घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचा संकल्प केला होता. मात्र जिल्ह्यात त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

Protest
Nashik News: नायलॉन मांजात अडकलेल्या घुबडाला जीवदान! जीवाला घातक नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन

निर्यातबंदीला विरोध करण्यासाठी व बाजार बंद आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यातील शेतकरी संघटनांनी बाजार समित्यांनी लिलाव बंद ठेवून आंदोलनास सहकार्य करण्याचे पत्र सभापतींना दिले आहे.

व्यापाऱ्यांनी मात्र या आंदोलनापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला. बाजार समितीत शेतमाल आला तर आम्ही लिलाव करू. मालाची आवकच झाली नाही, तर आम्ही लिलाव कसे करणार, असे सांगत त्यांनी शेतकरी संघटनांच्या आंदोलनातून स्वतःची सुटका करून घेतल्याचे दिसून आले.

"शेतकरी संघटनांनी पुकारलेले आंदोलन हे शेतकऱ्यांसाठी आहे. त्यांनी पाठिंबा दिला, तर आंदोलन यशस्वी होईल. आठ दिवस भाजीपाल्यासह कांदा, सोयाबीन आदी माल बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये. यासाठी बैठका घेऊन जनजागृती सुरू आहे. शेतमाल बंद झाल्यास सरकारला शेतकऱ्यांचा विचार करावाच लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील दोन दिवस आपला माल विक्रीसाठी आणू नये."- नाना बच्छाव, कार्याध्यक्ष, शेतकरी संघर्ष संघटना

"शेतकरी आपल्या न्याय मागण्यासाठी आता पुढे येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत मिळाली पाहिजे, यासाठी ही भूमिका घेतली आहे. या आंदोलनाची सुरवात झाली असून, त्यात शेतकरी सहभागी होत आहेत."- दीपक पगार, प्रदेशाध्यक्ष, रयत क्रांती संघटना

Protest
Ayodhya Ram Mandir: रामलल्लासाठी येवला पैठणीचे पितांबर, शेलाचे राजवस्त्र! येवल्याच्या बाळासाहेब कापसेंना मान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.