Nashik News : शहर पोलिस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांसह पोलिस ठाण्यांच्या सरकारी वाहनांसाठी गेल्या चार दिवसांपासून इंधन नाही. त्यामुळे गस्तीवरील निम्म्यापेक्षा अधिक वाहनांची चाके थांबलेली असून, गस्तीवर परिणाम झाला आहे.
तर, अत्यावश्यक वाहनांसाठी ग्रामीण पोलिसांच्या पंपावरून इंधन पुरवठा केला जात आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यातील सलग सुटीमुळे शहर पोलिस आयुक्तालयाच्या दोन्ही पेट्रोलपंपांना इंधन उपलब्ध होऊ शकले नसल्याचे समोर आले आहे. (Shortage of fuel for police vehicles More than half of vehicles on patrol stopped Nashik News)
नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाचे गंगापूर रोड आणि शरणपूर रोडवर दोन पेट्रोलपंप आहेत. या पेट्रोलपंपावर पोलिस आयुक्तांसह उपायुक्त, सहायक आयुक्त, आयुक्तालयातील अधिकारी आणि पोलिस ठाण्यांची सरकारी वाहनांना इंधन दिले जाते.
आयुक्तालयाच्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांनाही या पेट्रोलपंपावर इंधन दिले जाते. परंतु ठराविक कोटा पोलिसांच्या सरकारी वाहनांसाठी राखीव ठेवला जातो. मात्र, गेल्या आठवड्यात सलग पाच दिवस सुटी आली.
पोलिस पेट्रोलपंपांवर इंधनाचा जादा साठा करण्याची सुविधा नाही. त्याचप्रमाणे, आयुक्तालयाकडून ट्रेझरीकडे इंधनाच्या खरेदीसाठीचे पाठविलेली बिले रखडली. परिणामी शहर पोलिसांच्या पेट्रोलपंपांना इंधन उपलब्ध होऊ शकले नाही.
त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून शहर पोलिसांच्या पेट्रोलपंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, शहरभर पोलिस ठाणेनिहाय गस्ती घालणाऱ्या सरकारी वाहनांना इंधन न मिळाल्याने बहुतांशी वाहने पोलिस ठाण्यांमध्ये थांबली.
ठराविक वाहनांसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कोट्यातून इंधन उपलब्ध करण्यात आले. त्यामुळे ज्या वाहनांना इंधन उपलब्ध झाले त्या वाहनांवर अतिरिक्त ताण आला. याशिवाय पोलिस अधिकाऱ्यांच्या वाहनांनाही ग्रामीण पोलिसांच्या पेट्रोलपंपावरून इंधन घ्यावे लागले आहे.
अत्यावश्यक साठा राखीव
शहर पोलिसांच्या दोन्ही पेट्रोलपंपावर ठराविक अत्यावश्यक इंधनाचा साठा राखीव ठेवण्यात आलेला आहे.
इंधन तुटवड्याच्या काळात अचानक व्हीआयपी स्कॉडसह दंगलविरोधी पथक, शीघ्रकृती दल यासह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी हा इंधनाचा राखीव साठा ठेवण्यात आलेला असतो. हा साठा अत्यावश्यकतेसाठी राखीव असतो.
"सलग सुट्ट्यांमुळे ट्रेझरीकडे बिले रखडल्याने पोलिस पेट्रोल पंपावर इंधनाची तुटवडा निर्माण झाला. पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामीण पोलिसांकडून वाहनांसाठी इंधन उपलब्ध केले आहे. उद्यापासून नियमित इंधन उपलब्ध होईल."
- चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, पोलिस प्रशासन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.