बिल तपासणीत हलगर्जीपणा, दोन लेखापरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मागील वर्षी महापालिकेने सर्वच रुग्णालयांमध्ये १२५ लेखापरीक्षकांची नियुक्ती करून बिले तपासण्यास सुरवात केली
Auditor
AuditorGoogle
Updated on

नाशिक : कोरोनाबाधित रुग्णाच्या (Corona Patients) उपचारानंतर आकारण्यात आलेले बिल तपासणीत हलगर्जीपणा केल्याबद्दल महापालिकेने मेडिसिटी रुग्णालयात नियुक्त दोन लेखापरीक्षकांना (auditors) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर जादा बिल आकारल्याने न्यू नाशिक कोविड सेंटरलादेखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. (Show cause notice was issued to two auditors for negligence in bill investigation)

न्यू नाशिक कोविड सेंटरलादेखील नोटीस

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर अव्वाच्या सव्वा दर आकारणी करून कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मागील वर्षी महापालिकेने सर्वच रुग्णालयांमध्ये १२५ लेखापरीक्षकांची नियुक्ती करून बिले तपासण्यास सुरवात केली. रुग्णालयात नियुक्त करण्यात आलेल्या लेखापरीक्षकांच्या संदर्भातदेखील तक्रारी प्राप्त होत आहेत. बिले नियमित तपासली जात नाही, रुग्णांच्या नातेवाइकांना वेळेत न भेटणे आदी प्रकारच्या तक्रारी आहेत. आतापर्यंत साडेपाच कोटींहून अधिक रकमेची वजावट बिलांमधून करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात न्यू नाशिक कोविड सेंटरमध्ये एका रुग्णाकडून जादा बिलाची आकारणी केल्याची बाब समोर आल्यानंतर मुख्य लेखापरीक्षक बी. जी. सोनकांबळे यांनी चौकशी करून रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. तसेच मेडिसिटी हॉस्पिटलसाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन लेखापरीक्षकांनी कामात हलगर्जीपणा केल्याने नोटीस बजावली आहे. सात दिवसांमध्ये नोटीसला उत्तर देणे बंधनकारक आहे.

Auditor
VIDEO : नाशिकच्या बिटको रुग्णालयात शॉर्टसर्किट; सुदैवाने जीवितहानी नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.