Shravan Maas 2023: निसर्गाशी तादाम्य पावणारे श्रावणातील सण-उत्सव! प्रत्येक दिवसाचे ऊर्जावर्धक महत्त्व

Shravan Maas
Shravan Maasesakal
Updated on

पल्लवी कुलकर्णी : सकाळ वृत्तसेवा

Shravan Maas 2023 : श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे ! बालकवींच्या या काव्यातून मनाला उभारी मिळणाऱ्या श्रावणाचा गुरुवारी (ता. १७) पहिला दिवस.

श्रावणातील सण-उत्सव हे प्रत्येकाला निसर्गाशी तादाम्य पावायला लावतात. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व ऊर्जावर्धक असून, शिवभक्तांच्या भक्तीसाठी मांदियाळी सुरू झाली आहे. (Shravan Maas 2023 Festivals of Shravan in harmony with nature energizing significance of each day nashik)

सृष्टीतील बदलानुसार श्रावणातील सण साजरे होतात. नागपंचमी उत्साहाने साजरा होतो. पावसामुळे सगळी रान हिरवीगार झालेली असतात. पावसाच्या पाण्यामुळे नागोबा मुक्तसंचार करतात.

तेव्हा कुटुंबातील सदस्यांचे त्यांच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून आराधना करतात. शेतकरी नागराजाला मित्र म्हणून संबोधतात. त्यादृष्टीने नागपंचमीला महत्त्व आहे. श्रावणातील मंगळवारी साजरी होणारा मंगळागौर सण नवविवाहित सख्यांना एकत्र आणतो.

सुवासिनींचे हळदी-कुंकू होते. जागरण करत पाच वर्षे साजरी केली जाते. रक्षाबंधनाला भाऊ- बहिण एकमेकांप्रति प्रेम व्यक्त करतात. त्याचवेळी नारळी पौर्णिमेला कोळी बांधवांकडून समुद्राचे विधीवत पूजन करत मासेमारी सुरू होते.

त्यानंतरच्या कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सर्वत्र हर्षोल्हासात साजरा होतो. श्रावणी सोमवारी शिवभक्त शिवाची आराधना करतात. सोळा सोमवार व्रताची सुरवात होते. सायंकाळी नैवेद्य दाखवला जातो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shravan Maas
Shravan 2023 : व्रतवैकल्यांचा श्रावणमास आजपासून; सण- उत्सवांची रेलचेल

नववधू सोमवारी शिवामूठ शिवाला अर्पण करतात. मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. बुधवारी बुध पूजन, तर गुरुवारी समृद्धी-धनधान्य विपुलता यासाठी ब्रृहस्‍पती पूजन, शुक्रवारी कुटुंब अथवा पुढील पिढीच्या वृद्धीसाठी व सुखासाठी जीवतीचे पूजन आणि संध्याकाळी सुवासिनींना चणे-गूळ देवून हळदी-कुंकूचा कार्यक्रम होतो.

शनिवारी शनी, बजरंगबली व अश्वत्थ पूजन केले जाते. रविवारी आदित्‍यराणूबाई पूजन केले जाते. श्रावणात सूर्याचा नवाजन्म झाल्‍यासाखा भासत असतो. त्‍यामुळे आदित्‍यराणूबाई व्रताने सूर्याची उपासना केली जाते.

श्रावणातील पहिल्‍या रविवारी कानबाई हा सण मोठया उत्‍साहाने कुटुंबीय एकत्रितपणे साजरा करतात. असा हा श्रावण प्रत्येकाच्या मनाला आनंदाची रुंजी घालत असतो.

"श्रावण आला की महिलांची लगबग सुरू होते. माहेरी सणासाठी जायचे, त्‍यासाठीची तयारी आणि आपल्‍या कुटुंबातील सण साजरे करताना व्यवसायानिमित्त इतरत्र असलेले आम्ही कुटुंबीय एकत्रित येऊन मोठ्या आनंदात सण साजरे करतो." - कल्‍पना कुलकर्णी, अंबड

"आम्‍ही सगळ्या मैत्रिणी नागपंचमीला माहेरी जमलो की, खूप मजा करतो. एकत्रित झोके खेळतो. गाणी म्‍हणतो. आम्‍ही सगळ्या मैत्रिणी श्रावणाची आतुरतेने वाट पाहत असतो."

- दीप्ती मोरे, कॉलेज रोड

Shravan Maas
Shravan Month 2023 : सणांचा राजा श्रावण महिना..! व्रतवैकल्यांना आजपासून सुरुवात, महिलांसह भाविकांसाठी पर्वणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.