Shravan Maas: धार्मिक पुस्तकांच्या मागणीत वाढ! ज्येष्ठांबरोबरच तरुणाईचा धार्मिकता, अध्यात्माकडे वाढता कल

demand for religious books Along with elders religiousness of youth increasing
demand for religious books Along with elders religiousness of youth increasingesakal
Updated on

Shravan Maas : एकोणीस वर्षांच्या खंडानंतर यंदा अधिक श्रावणमासाचा योग आला आहे. आपल्या पूर्वजांनी खगोलीय घटना व दैनंदिन जीवन यांची सांगड कल्पकतेने घातली आहे. त्याबाबत आजच्या तरुणाईलाही मोठी उत्सुकता आहे.

श्रावणाच्या पार्श्‍वभूमीवर तरुणाईचा अध्यात्माकडे कल वाढत असल्याने धार्मिक, आध्यात्मिक पुस्तकांच्या मागणीतही वाढ झाली आहे. (Shravan Maas Increase in demand for religious books Along with elders religiousness of youth increasing trend towards spirituality nashik)

येत्या मंगळवारी (ता. १८) अधिक श्रावणास प्रारंभ होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बाजारात धार्मिक, आध्यात्मिक विषयांवरील पुस्तके दाखल झाली असून त्यांच्या मागणीत वाढ होत असल्याचे दिसून येते.

देशात धार्मिक पुस्तकांची सर्वाधिक निर्मिती गोरखपूर येथील गीता प्रेसमध्ये होते. येथील पुस्तकांची बांधणी, कागद चांगला असल्याने येथील धार्मिक पुस्तकांना अधिक मागणी असते.

या प्रेसला धार्मिक संस्थांकडून देणग्याही मिळतात, त्यामुळे येथे निर्माण झालेली धार्मिक पुस्तके खासगी छापखान्यात तयार झालेल्या पुस्तकांपेक्षा अधिक स्वस्त असतात.

यंदा कागदासह शाई, वाहतूक, मनुष्यबळ या खर्चात वाढ झाल्याने इतर पुस्तकांप्रमाणेच धार्मिक पुस्तकांच्या दरांत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.

छोटी (पॉकेट) धार्मिक पुस्तके अवघी दहा ते वीस रुपयांत उपलब्ध असली तरी पोथ्या मात्र अडीचशे रुपयांपासून सहाशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

यातही साधी व रेशमी बांधणीमुळे किमतीत फरक असल्याचे विक्रेते सांगतात. पोथ्या प्राकृत भाषेत ओवीबद्ध केलेल्या असतात तर कथासारात संबंधित पोथीचा सारांश असतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

demand for religious books Along with elders religiousness of youth increasing
Shravan Adhik Maas: अधिकमासात जावईबापूंना धोंडफळ! 18 जुलैपासून अधिकच्या महिन्याला सुरवात

मागणी असलेली धार्मिक पुस्तके-

श्रावण महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर श्री गुरू चरित्र, नवनाथ पोथी, शिवलीलामृत, पांडव प्रताप, श्री गजानन विजय पारायण, सचित्र अधिकमास माहात्म्य, अधिकमास कथासार, अधिकमास साधना व उपासना, संपूर्ण चातुर्मास, हरिविजय, श्री देवीमाहात्म्य यापुस्तकांना अधिक मागणी आहे.

तरुणाईची शॉर्टकटला पसंती

हल्लीच्या तरुणाईचा अध्यात्म, धार्मिकतेकडे कल वाढलेला आहे. परंतु मोठी पोथी, पुराणे वाचण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध नसल्याने त्यांच्याकडून श्री रामरक्षा, अथर्वशीर्ष, हनुमान चालिसा, गणपती स्त्रोत आदी छोट्या पुस्तकाच्या खरेदीला पसंती दिली जात आहे.

"१८ तारखेपासून अधिक श्रावणमास सुरू होत असल्याने धार्मिक पुस्तकांसह पोथ्यांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. ही पुस्तके १५ रुपयांपासून अडीचशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत." - शशांक गोसावी, संचालक, अरविंद बुक सेलर्स

"तरुणाईकडून पोथ्यांऐवजी श्रीरामरक्षा, हनुमान चालिसा, गणपतीस्त्रोत, अथर्वशीर्ष आदी छोट्या धार्मिक पुस्तकांची मागणी वाढली आहे." -जी. के. जोशी, संचालक, पुष्पक बुक सेलर्स.

demand for religious books Along with elders religiousness of youth increasing
Shravan Maas : 19 वर्षांनी श्रावणात दुर्मिळ योग! यंदा किती असणार श्रावण सोमवार? अधिक मासामुळं संभ्रमावस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.