Shravan Maas 2023 : श्रावण सोमवारच्या व्रताची परंपरा 21 ऑगस्टपासून; जाणून घ्या श्रावणी सोमवार व्रत कसे करावे...

Shravan Maas
Shravan Maasesakal
Updated on

Shravan Maas 2023 : आषाढ अमावास्या झाल्यावर सोमवार (ता. १७)पासून अधिक-श्रावण मासारंभ झालाय. अधिक मासामुळे श्रावण मास दोन महिन्यांचा असून, त्यातील पहिला सोमवारचा उपवास २४ जुलैला असेल.

पण, महाराष्ट्रात श्रावण सोमवार व्रताची परंपरा २१ ऑगस्टपासून सुरू होईल. पुरुषोत्तम तथा अधिक मासाची समाप्ती १६ ऑगस्टला होत असून, नीज श्रावणाचा प्रारंभ १७ ऑगस्टपासून होत आहे. धर्मशास्त्राच्या अभ्यासकांनी ही माहिती दिली. (Shravan Monday in Maharashtra tradition of fasting from 21st August nashik news)

अधिक-श्रावण मासारंभाला सुरवात झाल्याने श्रावणातील सोमवारचे व्रत कधी सुरू करायचे, याविषयीची उत्सुकता शिवभक्तांमध्ये आहे. त्या अनुषंगाने धर्मशास्त्र अभ्यासकांशी संवाद साधण्यात आला. नीज श्रावणातील सोमवारच्या व्रतासाठी २१, २८ ऑगस्ट, ४ व ११ सप्टेंबर हे दिवस असतील. मात्र, अधिक मासातील पूजाविधी करावयाचे आहेत.

अधिक मासातील सोमवार २४, ३१ जुलै आणि ७ व १४ ऑगस्ट असे आहेत. मात्र, महाराष्ट्रातील परंपरेनुसार नीज श्रावणातील सण साजरे केले जातात. नीज श्रावणात २१ ऑगस्टला नागपंचमी, ३० ऑगस्टला रक्षाबंधन आणि ६ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. तसेच, १४ सप्टेंबरला नीज श्रावणाची अमावास्या असून, त्या दिवशी पोळा सण साजरा केला जाईल. १५ सप्टेंबरला सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत नीज श्रावणाची अमावास्या असेल. १६ सप्टेंबरला भाद्रपद मासारंभ होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shravan Maas
Shravan Maas: धार्मिक पुस्तकांच्या मागणीत वाढ! ज्येष्ठांबरोबरच तरुणाईचा धार्मिकता, अध्यात्माकडे वाढता कल

श्रावणी सोमवार व्रत

श्रावणातील सर्व सोमवारी शिवभक्त उपवास करतात. शिवलिंगाची पूजा करतात. २१ ऑगस्टला तांदूळ, २८ ऑगस्टला तीळ, ४ सप्टेंबरला मूग आणि ११ सप्टेंबरला जवसाची मूठ शिवलिंगाला वाहिली जाईल.

शिवशंभूच्या मनोभावे पूजनाने घरातील दुःखातून मुक्तता मिळते. तसेच, मनातील इच्छांची पूर्तता होते, अशी भावना शिवभक्तांमध्ये आहे. धर्मशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार श्रावणातील सोमवारी शिवशंभूचे पूजन करताना चंदन, अक्षता, बेल, धोत्र्याचे पुष्प, दूध आणि जल अर्पण केले जाते. तसेच, १०८ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो.

त्यातून शांतता लाभते. शिवाय, शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण घराघरांमधून होते. शिवभक्त श्रद्धेने बेलाचे एक रोप लावून श्रावण साजरा करतात. त्याचबरोबर शिवशंभूला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा नैवेद्य दाखविला जातो. मग धूप आणि दीप प्रज्वलित करून शिवशंभूची आरती केली जाते. त्यानंतर प्रसादाचे वाटप होते.

Shravan Maas
Shravan 2023 Healthy Recipes: पावसाळ्यात हेल्दी राहण्यासाठी कुट्टूचं पीठ फायदेशीर, श्रावणात उपवासासाठी करा कुट्टूच्या पीठाच्या विविध रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.