Nashik Kalaram Mandir : श्री काळारामाला आज नव्या द्राक्षवाणांची आरास; सेवाभावी संस्थांना द्राक्षांची प्रसाद भेट

मंदिरातील गाभाऱ्यात नव्या द्राक्ष वाणांची आरास करण्यात येणार आहे.
A grape variety of world class 'Ara'
A grape variety of world class 'Ara'esakal
Updated on

Nashik Kalaram Mandir : अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रष्ठिपाना सोहळ्यानिमित्त सोमवारी (ता.२२) ‘सह्याद्री फार्म्स’ च्या शेतकऱ्यांच्या बागेतून ताजी, रसाळ रंगीत द्राक्षे येथील काळाराम मंदिरातील प्रभु श्रीरामाच्या चरणी दाखल होतील.

यावेळी मंदिरातील गाभाऱ्यात नव्या द्राक्ष वाणांची आरास करण्यात येणार आहे. (Shri Kalaram is blessed with new grapes today nashik news)

सह्याद्री फार्म्स ही शेतकऱ्यांची कंपनी द्राक्ष उत्पादन व निर्यातीत आघाडीवर आहे. या शेतकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून जागतिक दर्जाचे पेटंट द्राक्ष वाण प्रथमच भारतात आयात केले आहेत. या नव्या आरा रंगीत द्राक्ष वाणांची यशस्वी लागवड नाशिक भागात झाली असून हीच उत्तम गुणवत्तेची गोड, रसाळ द्राक्षे श्री काळारामाच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे.

आरस झाल्यानंतर हा द्राक्षांचा प्रसाद भाविकांबरोबरच परिसरातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम या सेवाभावी संस्थांना देण्यात येईल. सह्याद्री फार्म्सने जगप्रसिद्ध ग्राफा या ब्रिडींग कंपनीशी सहकार्य करार करुन पेटंट असलेल्या वाणांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा केला.

A grape variety of world class 'Ara'
Nashik Kalaram Mandir : प्रभू रामचंद्रास आफ्रिकेतून आणलेली वल्कल प्रदान; भाविकांच्या उपस्थितीत विधिवत सोहळा

या वाणांची यशस्वी लागवड इथल्या मातीत झाली आहे. अयोध्येत होणाऱ्या राममुर्ती प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर या नव्या आरा रंगीत द्राक्षवाणांच्या खुडणीचा व विक्रीचा शुभारंभ होत आहे. त्याचाच भाग म्हणून प्रभु श्रीरामास ही द्राक्षे अर्पण करण्यात येणार आहेत.

''शेतकऱ्यांनी स्वीकारलेले नवे तंत्रज्ञान आणि त्यांची अपार मेहनत यांना आलेली गोड, रसाळ फळे म्हणजे ही द्राक्षे आहेत. आरा रंगीत द्राक्ष वाणांच्या नव्या हंगामाचा शुभारंभ होत आहे. येणारा हंगाम राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लाभदायी ठरो, हीच श्रीरामाच्या चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत.''-विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्म्स.

A grape variety of world class 'Ara'
Nashik Kalaram Mandir : रामरक्षा पठणासाठी उसळली गर्दी; श्री काळाराम मंदिरात महिलांसह विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.