Nashik News: श्री कपालेश्‍वर शिवलिंगावर लवकरच वज्रलेप! पालखी सोहळ्याचेही वेळापत्रक निश्‍चित

Kapaleshwar temple latest marathi news
Kapaleshwar temple latest marathi newsesakal
Updated on

Nashik News : श्री कपालेश्‍वर शिवलिंगाची झीज होत असल्याने लवकरच सर्वांना विश्‍वासात घेऊन वज्रलेप लावण्यात येणार असल्याची माहिती विश्‍वस्त मंडळाने दिली.

प्रदोषसह दर सोमवारी काढण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्याचेही वेळापत्रक निश्‍चित करण्यात आल्याची माहिती विश्‍वस्त मंडळाने दिली. (Shri Kapaleshwar Shivling will soon vajralep schedule of Palkhi ceremony also fixed Nashik News)

नंदी नसलेले एकमेव शिवालय अशी ओळख असलेल्या श्री कपालेश्‍वर देवस्थानला श्रावण महिन्याचे औचित्य साधत लाखो भाविकांनी भेट दिली. देवस्थानतर्फे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असून त्यासंबंधीची माहिती विश्वस्त मंडळाने पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अध्यक्ष मंडलेश्‍वर काळे, उपाध्यक्ष रावसाहेब कोशिरे, सचिव ॲड. अक्षय कलंत्री, खजिनदार श्रीकांत राठी, विश्‍वस्त ॲड. प्रशांत जाधव, श्रद्धा दुसाने (कोतवाल), सुनील पटेल आदी उपस्थित होते.

शिवलिंगाची झीज झाल्याने त्यावर सर्वांना विश्‍वासात घेऊन वज्रलेप लावण्यात येणार असल्याचे श्री. काळे यांनी सांगितले. भाविकांच्या सोईसाठी पायऱ्यांवर नव्याने रेलिंग व विद्युत प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली असून गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तेरा सीसीटीव्ही कॅमेर बसविण्यात आले आहे.

मंदिराच्या कलशाकडील भागाचा जिर्णोद्धार लवकरच पूर्ण होईल. देणग्यांसाठी ऑनलाइन प्रणाली कार्यरत करण्यात आली असून शहरातील पाच ढोल पथकांच्या विनामूल्य सेवेसाठी वेळापत्रकही निश्‍चित करण्यात आल्याचे विश्‍वस्त मंडळाने सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पालखी सोहळ्याचे स्वतंत्र नियोजन

दर सोमवारसह प्रदोष निमित्त काढण्यात येणाऱ्या पालखी सोहळ्याचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.

दुपारी साडेतीन वाजता चांदीच्या पंचमुखी मुखवट्याचे मंदिरात आगमन, पावणेचार ते चारपर्यंत आरती सोहळा, चार वाजता पालखी सोहळ्यास प्रारंभ, साडेसहा वाजता पालखी रामतीर्थावर दाखल होईल.

तेथील विधिवत पुजेनंतर हा सोहळा मंदिराकडे रवाना होऊन नऊ ते साडेनऊ दरम्यान आरती. त्यानंतर आरती व पालखी सोहळ्याची सांगता होईल.

Kapaleshwar temple latest marathi news
Onion Subsidy: कांदा अनुदानाचा पहिला हप्ता खात्यात वर्ग होण्यास सुरवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.