नाशिक रोड : देवळाली गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री म्हसोबा महाराज यात्रेला रविवारपासून (ता. २६) मोठ्या उत्साहात सुरवात झाली. दोन दिवस सुरू राहणाऱ्या या यात्रेला शहर व जिल्ह्यातून सुमारे तीन लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी गर्दी करतील असा अंदाज आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे श्री म्हसोबा महाराजांची यात्रा मर्यादित भाविकांच्या उपस्थितीत सुरू होती. परंतु, यंदा कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्याने यात्रेला पुन्हा पूर्वीचे स्वरूप प्राप्त झाले असून त्यामुळे भाविकांमध्ये उत्साह आहे. (Shri Mhasoba Maharaj Yatra begins in Devalali pilgrimage will continue for 2 days nasik news)
यावेळी मांडव जहाळे व महाआरती प्रसंगी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार बबनराव घोलप, आमदार सरोज आहिरे, माजी महापौर दशरथ पाटील, नयना घोलप, त्र्यंबकराव गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, त्र्यंबकराव गायकवाड, सुधाकर जाधव, रामभाऊ जगताप, श्याम खोले, रमेश धोंगडे, उत्तम कोठुळे, सूर्यकांत लवटे,
योगेश गाडेकर, योगेश भोर, श्रीकृष्ण लवटे, भय्या मनियार, शांताराम भागवत, नितीन खर्जुल, विजय भागवत, योगेश भोर, अतुल धोंगडे, बाजीराव भागवत, मंगेश लांडगे, विकास गीते, मंगेश खालकर, प्रसाद सोनवणे आदी उपस्थित होते. अध्यक्ष ॲड. शांताराम कदम, उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, कार्याध्यक्ष बाकनाथ सरोदे,
सेक्रेटरी रुंजा पाटोळे, शिवाजी लवटे, सूर्यभान घाडगे, कैलास चव्हाण, संतोष खोले, संपल खोले, सुनील गायकवाड, सुरेश खोटे, विजय खोले, प्रमोद बुवा, मंगेश गीते, गोविंद गीते, दीपक लवटे, संतोष माळवे, प्रवीण कुलथे आदी संयोजन करीत आहे.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
विविध धार्मिक कार्यक्रम
यात्रा तीन दिवस सुरू असते. परंतु, गेल्या काही वर्षापासून भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सदरची यात्रा चार दिवस सुरू असावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. रविवारी (ता. २५) सकाळी यात्रेला विविध धार्मिक कार्यक्रम व पूजा अभिषेक करून सुरवात झाली.
पहाटे योगेश गाडेकर, जयश्री गाडेकर, उमेश जाधव, नंदा जाधव यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मांडव डहाळी कार्यक्रम करण्यात आला.
भाविकांच्या लांबच लांब रांगा
यात्रेनिमित्त श्री म्हसोबा महाराज मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर व परिसरात पूजेच्या साहित्याचे दुकाने, खेळणी व खाद्यपदार्थाचे दुकाने थाटण्यात आली आहे.
सकाळपासूनच मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. यात्रेची वाढती गर्दी लक्षात घेता वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येत आहे. मंदिराच्या समोर पोलिसांनी स्वतंत्र कक्ष उभारला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.