Nashik News : श्री.स्वामी सेवामार्ग देणार बालकांना ‘स्वसंरक्षणाचे’ धडे : नितीनभाऊ मोरे

Trimbakeshwar : All India Shri. 'Self-defence' lessons taught to children at Swami Samarth Sevamarg Gurupeeth.
Trimbakeshwar : All India Shri. 'Self-defence' lessons taught to children at Swami Samarth Sevamarg Gurupeeth.esakal
Updated on

Nashik News : अखिल भारतीय श्री. स्वामी समर्थ सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागातर्फे बालसंस्कार वर्गातील मुलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ गुरुपीठात मासिक महासत्संगाच्या शुभ पर्वावर झाला.

गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे व देश-विदेश अभियान व बालसंस्कार -युवा प्रबोधन विभागप्रमुख नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

अखिल भारतीय श्री. स्वामी सेवामार्गाची देश-विदेशात हजारो बालसंस्कार केंद्रे आहेत. या केंद्रातील मुलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी राज्यभरातून आलेल्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या १८० प्रतिनिधींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले.(Shri.Swami will give Sewamarg lessons to children on self defense Nitin Bhau More laudable initiative of Child Welfare and Youth Education Department Nashik News)

हे प्रतिनिधी केंद्रा-केंद्रात जाऊन मुलांना स्वसंरक्षणांचे प्रशिक्षण देतील, असे या उपक्रमाचे नियोजन आहे. या प्रतिनिधींना श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये दरमहा विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणाचा शुभारंभ २४ जून रोजी मासिक महासत्संगाच्या शुभप्रसंगी करण्यात आला. संपूर्ण दिवसभर हे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणानंतर रविवारी (ता.२५) युवक-युवती व विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षणाकरिता लाठी-काठीची प्रात्यक्षिके घेण्यात आली.

याबरोबरच बालसंस्कार विभागाच्या सभागृहात मुलांसाठी स्वसंरक्षणासह ब्रेन एक्सरसाईज व लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्यात आले. पाल्य आणि पालकांच्या समस्यांवर योग्य मार्गदर्शन होण्यासाठी समुपदेशन केले जाणार आहे.

हा उपक्रमही नियमितपणे राबविण्यात येणार आहे. समुपदेशन करणाऱ्या प्रतिनिधींनी समुपदेशन कशा पद्धतीने करावे, त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. इयत्ता दहावी व बारावीमध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Trimbakeshwar : All India Shri. 'Self-defence' lessons taught to children at Swami Samarth Sevamarg Gurupeeth.
Nashik Crime: शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक करणारा फरार द्राक्ष व्यापारी 2 गावठी कट्ट्यांसह अटकेत

संस्कारक्षम पिढीची आवश्यकता

बालसंस्कार विभागाच्या सभागृहात झालेल्या मासिक चर्चासत्रात मार्गदर्शन करताना नितीनभाऊ मोरे यांनी मूल्यसंस्काराचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवा आणि मूल्यसंस्काराची चळवळ अधिकाधिक गतिमान करा, असे आवाहन केले.

संस्कार केले तर सर्वगुण संपन्न पिढी निर्माण होईल आणि समाजात विधायक बदल घडून येतील. देशाला संस्कारक्षम पिढीची नितांत आवश्यकता आहे असे श्री. मोरे यांनी नमूद केले.

Trimbakeshwar : All India Shri. 'Self-defence' lessons taught to children at Swami Samarth Sevamarg Gurupeeth.
Nashik Political: ‘ब्रेक के बाद' नाशिक मध्य मधून गितेंचे रणशिंग! ट्रिपल इंजिन अपयशाच्या मुद्यावर उठविले रान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.