पिंपळगाव बसवंत : घरची परिस्थिती बेताची. त्यामुळे नववीत शाळा सोडावी लागली. वडिलांना फसवून काका-चुलत्यांनी जमीन परस्पर विकली. अठराविश्व दारिद्रय वाट्याला आले.
कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नसल्याने वैफल्यग्रस्त श्याम दत्तात्रय सूर्यवंशी १७ व्या वर्षी दारूच्या आहार गेला. दारू समस्याचे उत्तर नाही, याचा साक्षात्कार त्याला झाला आणि मनाचा ठाम निश्चय करून मद्याच्या प्याल्याला ठोकर मारली.
१५ वर्षांपूर्वी केलेला संकल्प आजही टिकून ठेवणाऱ्या श्यामच्या संसाराची गाडी आता रूळावर आली आहे. (Shyam suryavanshi from pimplegaon baswant life success mantra refuse alcohol nashik)
धोबी समाजाचा श्याम सूर्यवंशी यांची कथा व्यवसनात बुडालेल्या तरुणांसाठी निश्चित प्रेरणादायी आहे. श्यामचे शिक्षण घराची हलाखीच्या परिस्थितीमुळे सुटले. वडिलही दारूच्या नशेत असायचे.
त्यातून काकांनी फसवणूक करून वडिलांची जमीन विकली. आर्थिक संकटाचा डोंगर कोसळला. श्याम तेथूनच दारूच्या आहारी गेला.
लॉंड्रीच्या पारंपरिक व्यवसायाबरोबरच गवंडी काम, वेटर, क्लीनर, असे काम श्याम करायचा, पण अर्धी कमाई दारूतच गमावली जायची. त्यामुळे घरभाडे देणे कठीण व्हायचे. तीन महिन्यांचे भाडे थकले, म्हणून घरमालकाने भांडे ठेवून आम्हाला घरातून हाकलले, असे श्याम सांगत होता.
दिवसभर नशेत डुबलेल्या श्यामच्या मुलांना शिक्षणासाठी मामाकडे धाव घ्यावी लागली. १३ वर्ष दारू पिऊन परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचा साक्षात्कार श्यामला झाला आणि मनाशी निश्चय केला, की दारूच्या थेंबालाही यापुढे स्पर्श करायचा नाही.
तो संकल्प करून आज श्यामला १५ वर्षे झाली. त्या निश्चयावर तो आजही ठाम आहे. मुले शिक्षित झाली. कुटुंबात पुन्हा आनंदाची लहर उमटली. प्रियंका लॉंड्रीच्या माध्यमातून श्याम ‘घरगाडा’ आनंदाने चालवत आहे.
‘चिमणी-पाखरं’ चित्रपटातील दारूडा पती व त्या कुटुंबाची वाताहतीची कथा श्यामच्या आयुष्याकडे नजर टाकल्यावर प्रत्यक्ष घडल्याचे जाणवते.
अनेक जण मद्य प्राशन करून नववर्षाचे स्वागत करण्याची विदेशी पद्धत आपल्याकडे रूढ होत आहे. मित्रांच्या सोबतीने अनेक जण व्यसनात ओढले जातात आणि आयुष्य व संसाराची राखरांगोळी करून बसतात.
काही जण दारू समस्यांचे उत्तर नाही, हे उमगल्याने नववर्षाच्या प्रारंभी त्यागाचा निर्णय घेतात. व्यसनमुक्तीचा हा संकल्प कायम राखण्यासाठी श्याम सूर्यवंशी याची कथा प्रेरणादायी ठरेल.
"तेरा वर्षे दारूचे प्याले रिचविले, याचा आजही पश्चाताप होतो. शारीरीक हानी, समाजात बदनामी, आर्थिक नुकसान, अशा सर्व बाजूने मी पिचला होतो. व्यसनमुक्तीचा तो १५ वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय आजही आठवतो. दारूसह कोणत्याच व्यसनापासून तुम्ही समाधानी होऊ शकत नाही आणि प्रश्नही सुटत नाहीत."-श्याम सूर्यवंशी
"दारूच्या नशेने मला आयुष्यावर पाणी सोडण्याची वेळ आली होती. दारूमुळे शरीराला जडलेल्या गंभीर आजारातून डॉक्टरच्या कृपेने जीवंत आहे. श्याम सूर्यवंशी सारख्या तरुणाचा आदर्श इतर तरुणांनी घेत व्यसनुमक्त व्हावे. व्यसनमुक्तीची मोठी चळवळ मी उभी करीत आहे." -महेंद्र साळवे, तालुकाध्यक्ष, आरपीआय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.