Nashik Leopard News : नायगाव (ता. सिन्नर) शिवारातील शेतकरी दशरथ भगत यांच्या शेतातील शेततळ्यावर परिसरातील शेतकऱ्यांसह मजुरांनी बांधवांनी बिबट्याच्या मादीसह दोन बछडे पाहिले.
नाशिक पश्चिम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी बिबटे दाखविले. रविवारी (ता. ८) सकाळी तत्काळ सिन्नरच्या वन विभागाच्या पथकाने येथे पिंजरा लावला. (Sighting of female leopard with cubs in village Shivara forest department replaced cage back nashik)
शेतकरी मंगेश कातकाडे रात्री जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले होते. त्यांना ओहोळचे शेतकरी शंकर भगत यांच्या सोयाबीन शेतात प्राण्यांचे डोळे बॅटरीच्या प्रकाशात दिसले. ते बिबटे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
श्री. कातकाडे यांनी भ्रणध्वनीवरून वन विभागाची व्हॅनला बोलविले. त्यावेळी दशरथ भगत यांच्या शेतातील शेततळ्यात बिबट्यांचा फॅमिलीचा मुक्त विहार सुरू होता. गट क्रमांक २९० व २९१ मध्ये मादीसह दोन बिछडे दिसले.
शेतकऱ्यांना सूचना देऊन पथक रवाना झाले. या भागात सोयाबीन सोंगणीला शेतमजूर आले आहेत.त्यांनी पुन्हा रात्री बिबट्यांचा फॅमिलीचा मुक्त विहार पाहिला.
त्यामुळे वन विभागाने शिंदे रस्त्यावर लावलेला पिंजरा काढून दशरथ भगत यांच्या शेततळ्याजवल लावला. नयगाव शिवारात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दोन वेळा पिंजऱ्याची जागा बदलावी लागली आहे.
"जोगलेटेंभीला दोन वर्षांपूर्वी मुलगा विवेक, आता पुतण्या शुभम ताटे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. शिवारात भीतीदायक स्थिती आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याला गस्त घालून बिबटे कसे हाती लागतील? सर्वांना पकडून प्राणी संग्रहालयात पाठवा."
-कैलास ताटे, शेतकरी, जोगलेटेंभी
"शेतकरी दशरथ भगत यांच्या शेततळ्यावर मादीसह दोन बछडे पाहिले. आम्ही वन विभागाच्या गस्तीच्या गाडीला बोलावले. त्यांनी या ठिकाणी रविवारी पिंजरा लावला."
-मंगेश कातकाडे, शेतकरी, नायगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.