Nashik Kumbhmela : एक्झिबिशन, लग्नसमारंभासाठी शेतकऱ्यांना जागा; साधुग्रामच्या जागेसाठी नवीन प्रस्तावाची तयारी

NMC News
NMC News esakal
Updated on

Nashik Kumbhmela News : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करणे महापालिकेला परवडणारे नाही व शासनाकडूनदेखील एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याची मानसिकता नसल्याचे दिसून येत असल्याने त्या पार्श्वभूमीवर मध्यम मार्ग काढण्याच्या अनुषंगाने महापालिकेकडून नवीन प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे. (simhasth kumbh mela Municipal Corporation is preparing new proposal for Sadhugram site nashik news)

यामध्ये सिंहस्थ कालावधी वगळता अकरा वर्षांसाठी ना विकास क्षेत्रात असलेली साधुग्रामची जागा एक्झिबिशन सेंटर किंवा लग्नसमारंभ या कामासाठी शेतकऱ्यांना वापरण्यास देणे, अशा प्रकारचा हा प्रस्ताव असल्याचे समजते.

दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्यासाठी जगभरातून साधू-महंत नाशिकमध्ये दाखल होतात. त्यासाठी तपोवनात महापालिकेच्या वतीने निवासव्यवस्था केली जाते. कुंभमेळ्याच्या निमित्ताने कायमस्वरूपी जागा ताब्यात घेण्याची अनेक वर्षांपासून मागणी आहे.

मात्र जागा ताब्यात घेताना शेतकऱ्यांचा विरोध, त्यांना मिळणारा मोबदला, तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख भक्कम किंवा टीडीआर देऊन भूसंपादन करणे महापालिकेला परवडणारे नाही. भूसंपादन केल्यास सदरची जागा सांभाळणेदेखील अवघड आहे. त्याजागेवर अतिक्रमण झाल्यास अतिक्रमण हटविण्यासाठी खर्च होणारा वेळदेखील परवडणारा नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC News
Nashik Dada Bhuse : ‘क्वालिटी सिटी’ चळवळीत सहभागी व्हा : पालकमंत्री भुसे

मागील कुंभमेळ्यामध्ये शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर जागा घेऊन कुंभमेळा संपल्यानंतर पुन्हा त्या जागा ताब्यात देण्यात आल्या. २०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने तयारी केली आहे.

पालकमंत्री दादा भुसे यांनीदेखील नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत महापालिकेला आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने महापालिकेने साधुग्रामसाठी निधी देण्याची मागणी केली किंवा टीडीआर स्वरूपात मोबदला देताना अडीच पट द्यावा, असे सुचविले.

१८० एकर जागा संपादित करण्यासाठी जवळपास साडेचार हजार कोटी रुपये लागणार आहे. मात्र शासनाकडून अद्यापपर्यंत प्रतिसाद मिळालेला नाही. त्या अनुषंगाने नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे.

साधुग्रामच्या जागेची सद्यःस्थिती

सद्यःस्थितीत तपोवनातील तब्बल २६४ एकर जागेवर साधुग्रामचे आरक्षण आहे. यामध्ये १७ एकर जागा अग्निशमन व पार्किंगसाठी आरक्षित आहे. ५४ एकर जागा महापालिकेने संपादित केली होती. जवळपास साडेतेरा एकर जागेचे संपादन सुरू आहे. १८० एकर जागा महापालिका ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे.

NMC News
Simhasth Kumbhmela : आपत्तीशी लढण्यासाठी अद्ययावत साहित्य; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीस प्रारंभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.