Simhasth Kumbhmela : आपत्तीशी लढण्यासाठी अद्ययावत साहित्य; सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीस प्रारंभ

Simhastha Kumbh Mela Disaster Management Department has started collecting latest materials nashik news
Simhastha Kumbh Mela Disaster Management Department has started collecting latest materials nashik newsesakal
Updated on

Simhasth Kumbhmela : सिंहस्थाच्या तोंडावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने आतापासूनच अद्ययावत साहित्याची जमवाजमव सुरू केली. रबरी बोटींपासून ते अद्ययावत संपर्क यंत्रणांनी निवारण कक्ष अद्ययावत होत आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने आग नियंत्रण उपकरण अद्ययावतीकरणापासून कामाची सुरवात करताना ४० आग नियंत्रणाची उपकरणे, २० आग नियंत्रण बॉल आणले आहेत. तसेच, ४० पारंपरिक यंत्रे विविध कार्यालयांना पुरविण्यात आले आहेत. (Simhastha Kumbh Mela Disaster Management Department has started collecting latest materials nashik news)

त्याशिवाय आग लागल्यावर आगीच्या लोटात वितळून फुटणारे व त्यातून आगीवर नियंत्रणासाठी लागणारे आग नियंत्रण साहित्य, आगीवर टाकण्यात येणारे अद्ययावत स्वरूपाचे २० फायर बॉल खरेदी करण्यात आले. आगीत मनुष्यहानी टाळण्यासाठी दुरूनच आगीत फेकल्यावर आग नियंत्रण करणारे नवीन फायर बॉल कक्षात दाखल आहेत.

रबरी बोटीचे आगमन

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण विभागाला रात्रीच्या सर्च लाईट, संपर्क यंत्रणा कोलमडलेल्या भागासाठी सॅटेलाईट फोन, अद्ययावत रबरी बोट लागते. शहरात नियंत्रण कक्षात एक अद्ययावत बोट तयार ठेवण्यात आली आहे. निफाड भागात तीन बोटी ठेवण्यात आल्या आहेत. दरडीसह जुने वाडे ढासळून पडल्यावर त्याखाली अडकणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तसेच मलबा हटविण्याचे अद्ययावत कटर लागतात.

तसेच, रात्री जीव वाचविण्यासाठीचे कामकाज लाइट टॉवरसह जास्त क्षमतेच्या बॅटऱ्या, सर्च लाईट आदी अद्ययावत साहित्य वापरण्याचे प्रशिक्षण वर्ग चालविले जातात. त्यात आतापर्यंत ५०० आपदा मित्रांना प्रशिक्षण देऊन त्यांना पर्सनल सेफ्टी किट देण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Simhastha Kumbh Mela Disaster Management Department has started collecting latest materials nashik news
Nashik News : ‘कंट्रोल ब्लास्टिंग’ ने हादरले राजीवनगर; इमारती, बंगल्यांना जबरी हादरे

लाइफ जॅकेटची मागणी

आगामी काळात जीव वाचविण्यासाठी शासनाकडे चार रॅपलिंग किटची मागणी करण्यात आली आहे. डोंगरमाथ्यावर रस्ता चुकल्याने अनेक पर्यटक अडकून पडतात, अशा पर्यटकांपर्यंत पोचण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून चार रॅपलिंग किट मागविले आहेत. नाशिक जिल्ह्यात धरणे, बंधारे, तलावांची संख्या जास्त आहे.

पावसाळ्यात ओसंडून वाहणारे धबधबे आणि धरणावर पर्यटक गर्दी करतात. त्यात अनेकदा दुर्घटना घडून अनेकांचे मृत्यू झाले आहेत. त्यासाठी ४० लाइफ जॅकेट मागविण्यात आले. १५ लाइफ रिंग आणि त्यांच्या बॅटरीची मागणी या विभागाने शासनाकडे केली आहे.

"आगामी काळात आणखी अद्ययावत साहित्य येणार आहे. अद्ययावत साहित्यासह आपदा मित्रांना प्रशिक्षण दिले जाते." - श्रीकृष्ण देशपांडे, अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन

Simhastha Kumbh Mela Disaster Management Department has started collecting latest materials nashik news
NMC News : खासगी मालमत्ता महापालिका सांभाळणार; विद्युत विभागाचा अजब प्रकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.