नाशिक : २०२७ मध्ये पार पाडणाऱ्या संस्था कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीने एकूण आठ हजार ११७ कोटी रुपयांचा आराखडा निश्चित करताना त्या व्यतिरिक्त भूसंपादनासाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
३००० कोटी निधीमध्ये २७०० कोटी रुपये मिसिंग लिंकसाठी खर्च करण्याची तयारी बांधकाम विभागाने केली असून, उर्वरित ३०० कोटी रुपये सिंहस्थाच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या अमेनिटी उपलब्ध करून देण्यासाठी खर्च केले जाणार आहे.
जवळपास ५५ मिसिंग लिंक सिंहस्थासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीतून खर्च केले जाणार आहे. मिसिंग लिंक विकसित करताना महत्त्वाच्या तसेच रिंग रोडला जोडले जाणार असल्याने या माध्यमातून वाढत्या वाहतुकीचा प्रश्नदेखील काही प्रमाणात निकाली लागणार आहे. (Simhastha Kumbh Mela Fund 2700 crore for missing link problem of transportation will be resolved nashik)
२०२७-२८ मधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भाविक व साधू, महंतांना सुविधा पुरविण्यासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने आराखडा तयार केला आहे.
नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यात महापालिकेची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे महापालिकेकडून विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
आराखडा तयार करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आराखडा समन्वय समिती स्थापन करण्यात आली.
समितीकडून ४२ विभागांकडून विकास आराखडा मागविण्यात आला. त्यात बांधकाम विभागाने ३७३० कोटी रुपये, मलनिस्सारण विभागाकडून २४७१ कोटीचा प्राथमिक आराखडा सादर करण्यात आला.
आरोग्य व वैद्यकीय, अग्निशमन, उद्यान, पाणीपुरवठा, जनसंपर्क, घनकचरा विभागाकडूनही खर्चाची आकडेवारी सादर करण्यात आली. त्या वेळी आठ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा आहे. वाराणसी येथे २०२५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे.
तेथील उपाययोजनांच्या धर्तीवर नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेचे पथक यापूर्वी एकदा भेट देवून गेले.
कामे सुरू होण्यापूर्वी आणखी एक भेट पथक देणार आहे. गोदावरी नदीकाठी घाट विकास, प्रदूषणमुक्ती, मलनिस्सारण केंद्रांच्या सक्षमीकरणावर या माध्यमातून भर दिला जाणार आहे.
नियोजन फसण्याची शक्यता
मागील सिंहस्थामध्ये जवळपास ९० किलोमीटरचा बाह्य रिंगरोड तयार करण्यात आला, त्या रिंगरोडला जोडणाऱ्या मिसिंग लिंक आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर जोडले जाणार आहे.
८११७ कोटी व्यतिरिक्त भूसंपादनासाठी ३००० कोटी रुपये मागणी शासनाकडे केली जाणार आहे. त्यात २७०० कोटी रुपये मिसिंग लिंकच्या भूसंपादनासाठी खर्च केले जाणार आहे.
राज्य शासनाकडून किती प्रमाणात निधी उपलब्ध होतो, त्यावर मिसिंग लिंक विकसित केले जाणार आहे. महापालिकेने जवळपास ११, ००० कोटींच्या वर विकास आराखडा तयार केला असला तरी मागील सिंहस्थ कुंभमेळ्याचा अनुभव लक्षात घेता तीन ते चार हजार कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतात.
त्यामुळे महापालिकेने कुंभमेळ्यासाठी केलेले नियोजन फसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सहा विभागातील मिसिंग लिंकचे काम करताना महापालिकेने स्वनिधी खर्च करू नये अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.