Nashik News : सिंहस्थ रिंगरोड सर्वेक्षणाचे काम प्रगतिपथावर; पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतला आढावा

सार्वजनिक बांधकाम मंत्री व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (ता. १७) महापालिका व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली
NMC & dada Bhuse
NMC & dada Bhuseesakal
Updated on

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात येणाऱ्या वाहतुकीला बाह्य वळणाद्वारे वळविण्यासाठी ५६ किलोमीटरचे दोन रिंगरोड तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मोनार्च सल्लागार संस्थेने सर्वेक्षण पूर्ण केले असून, पुढील कार्यवाहीसाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. (Simhastha Ring Road Survey work on progress Guardian Minister Dada Bhuse reviewed Nashik News)

सार्वजनिक बांधकाम मंत्री व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी (ता. १७) महापालिका व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात रिंगरोडचा आढावा घेण्यात आला.

शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन यंदा बाह्यवळण रस्ता तयार करण्याचे नियोजन आहे. दोन टप्प्यात एकूण ५६ किलोमीटर लांबीचा हा रिंगरोड आहे. रिंगरोड तयार करण्याची तयारी नाशिक महापालिकेने दाखविली होती.

परंतु त्यासाठी शासनाकडून निधीची अपेक्षा होती. परंतु शासनाकडून निधी देण्याऐवजी शासनाकडून स्वयंत्रणेकडूनच रस्ता तयार करता येवू शकतो त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंहस्थ परिक्रमा मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला.

रस्ते विकास महामंडळाने पुणे येथील मोनार्च या सल्लागार संस्थेची सर्वेक्षणासाठी नियुक्ती केली. संस्थेने रिंगरोडचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. त्याचा आढावा पालकमंत्री भुसे यांनी घेतली.

महापालिकेचे शहर अभियंता शिवकुमार वंजारी, नगररचनाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, संदेश शिंदे उपस्थित होते. यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ३६ मीटर तसेच ६० मीटरच्या डिपीरोडचे सादरीकरण करण्यात आले.

NMC & dada Bhuse
NMC News : महापालिकेच्या 400 सुरक्षारक्षकांना मुदतवाढ

असा आहे प्रस्तावित सिंहस्थ परिक्रमा मार्ग

नाशिक शहरात येणारी वाहतूक बाह्य वळणाद्वारे वळविण्यासाठी २६ व ३० किलोमीटरचे दोन असे एकूण ५६ किलोमीटरचे रिंगरोड प्रस्तावित आहेत.

महापालिका खत प्रकल्पापासून पाथर्डी शिवारातून वालदेवी नदीला समांतर पिंपळगाव खांब शिवार, वालदेवी नदीपलीकडे विहीतगाव शिवार, विहीतगावपासून पुढे नाशिक-पुणे महामार्ग ओलांडून चेहेडी शिवारातून पंचक गाव, माडसांगवी शिवारातून महापालिका हद्दीबाहेर औरंगाबाद रोडलगत आडगाव शिवार व ट्रक टर्मिनसपर्यंत साठ मीटरचा पहिला रिंग रोड आहे.

तर आडगाव ट्रक टर्मिनस येथून ३६ मीटर रुंदीचा दुसरा रिंगरोड आहे. आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, नाशिक तालुक्यातील जलालपूर, बारदान फाटा, गंगापूर रोड, ओलांडून गंगापूर उजवा तट कालवा, सातपूर एमआयडीसी, पश्चिम भागालगत त्र्यंबक रोडपर्यंत व पुढे गरवारे पॉइंटपर्यंत दुसरा रिंगरोड आहे.

NMC & dada Bhuse
Nashik News : राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी बाजारपेठ सजली; मूर्ती, स्टिकर विक्रीस दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()