NMC News: सिंहस्थ खर्चाचे लेखा परिक्षणावर लक्षवेधी! मनपा अधिकाऱ्यांचे दणाणले धाबे, हिशेबच ठेवला नसल्याची बाब

NMC News
NMC Newsesakal
Updated on

नाशिक : महापालिकेतर्फे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू असतानाच २०१५ मध्ये पार पडलेल्या कुंभमेळ्यात झालेल्या खर्चाचा हिशेबच महापालिकेने ठेवला नसल्याची बाब समोर आली असून या संदर्भात आज विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.

जुन्या कामांचे लेखापरीक्षणच न झाल्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्या साठी निधी मिळेल का नाही यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने महापालिकेच्या संथगतीने काम करण्याच्या वृत्तीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Simhasthas expenditure on audit attention Manipulation authorities worried about fact they not kept accountable NMC Nashik)

दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्यासाठी महापालिका पायाभूत सुविधा पुरवते. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. सन २०१५ व १६ च्या कुंभमेळ्यासाठी २३७८.७८ कोटी रुपये निधी मंजूर झाला होता.

त्यात नाशिक महापालिकेला १०५२.६१ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाला ६६० कोटी रुपये तर जलसंपदा विभागाला १६९ कोटी रुपये, जिल्हाधिकारी कार्यालयाला ९८ कोटी तर नाशिक पोलिसांना ९३ कोटी रुपयांचा निधीचा यात समावेश होता.

कुंभमेळा संपल्यानंतर प्राप्त झालेल्या निधीचे लेखा परीक्षण करणे बंधनकारक आहे. असे असतानाही लेखापरीक्षण झाले नाही.

शिवाय प्राप्त निधीच्या विनियोगाची ऑडिट बॅलन्स शीट देखील तयार करण्यात आलेले नाही, अशी माहिती वित्त व लेखा विभागाकडून माहिती अधिकार कार्यकर्ते देवांग जानी यांना माहिती अधिकारात देण्यात आली.

दरम्यान या विषयावर नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले व नाशिक ‘पश्चिम’च्या आमदार सीमा हिरे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली. या लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने नागपूरला बोलाविण्यात आले.

NMC News
NMC News: महापालिका मुख्यालयात फेब्रुवारीत पुष्पोत्सव; अंदाजपत्रकात 50 लाखांची तरतूद

पुढील निधी मिळण्यात अडचणी?

२०१५-१६ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडला. कुंभमेळा संपून जवळपास आठ वर्षे उलटली, तरी २३७८ कोटींचे हिशोबपत्र सादर करण्यात आले नाही. या खर्च झालेल्या निधी खर्चात गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे.

खर्चाचे ऑडिट झाले नसल्याने २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी निधी मिळण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात महापालिकेला विचारणा करण्यात आली. त्यामुळे खर्चाच्या संदर्भात चौकशी लागण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.

NMC News
Nashik News: चांदशी शिवार मनपात समाविष्ट करण्याच्या हालचाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.