Sinnar Bazar Samiti : सभापतीपदासाठी हाय व्होल्टेज ड्रामा.. संचालक फोडाफोडीत कोणाला यश?

MLA Manikrao Kokate,
Former MLA Rajabhau Waje,
Youth leader Uday Sangle
MLA Manikrao Kokate, Former MLA Rajabhau Waje, Youth leader Uday Sangleesakal
Updated on

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सिन्नर बाजार समितीच्या सभापती पदासाठी हाय होल्टेज ड्रामा होणार असल्याचे चित्र आहे. आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे यांच्या गटाला समसामन ९-९ जागा मिळाल्याने सभापती पदाचा तिढा वाढला आहे. (sinnar bazar samiti rift for Speaker post has widened due to 3 group got equal 9 seats nashik news)

त्यामुळे ईश्वर चिठ्ठीमध्ये लॉटरी लागणार? एकमेकांचे संचालक फोडाफोडी करण्यात माजी आमदार राजाभाऊ वाजे , युवा नेते उदय सांगळे तसेच आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाला येणार का? हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. यासह निवड कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे....

पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार

कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिन्नर पोलिस प्रशासनाकडून वाढीव पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कोणी अनुचित प्रकार केल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष कुटे यांनीसांगितले

हात उंचावून मतदान का गुप्त मतदान?

वाजे सांगळे व कोकाटे गटाला समसमान ९, ९ जागा मिळाल्या असल्याने सभापतीपद निवडीचा तिढा आहे. त्यामुळे सर्व १८ संचालक हात उंचावून मतदान करण्याची मागणी करणार का? गुप्त पद्धतीने मतदान करणार हे उद्याच ठरणार आहेत, हात उंचावून का गुप्त मतदान याबाबत संचालकांच्या बहुमताच्या मागणीचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. या निवडीकडे सिन्नर करांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

MLA Manikrao Kokate,
Former MLA Rajabhau Waje,
Youth leader Uday Sangle
Milk Rates Hike : सर्वसामान्यांचा रोजचा चहा कडू; दुधाच्या भावाने गाठली शंभरी!

सभापतीपदासाठीचे दावेदार ?

आमदार कोकाटे गटाचे द्राक्ष बागायतदार संघाचे शशिकांत गाडे तर वाजे-सांगळे गटाकडून सोनंबे गावचे सरपंच डॉक्टर रवींद्र पवार हे सभापतीच्या शर्यतीत हे दावेदार असून कोणाच्या गळ्यात ही माळ पडणार याकडे लक्ष लागले आहे.

सिन्नर बाजार समितीच्या सभापतीपदी ईश्वर चिठ्ठी का फोडाफोडी होते हे पाहणे अस्तुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे मतदारांनी समतोल ठेवल्याने राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरणार आहे.

दोन्ही गटाला समसमान जागा मिळाल्या. आता, सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे. सिन्नर कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवा नेते उदय सांगळे यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. या दोघांच्या गटाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सभापतीपदाचा पेच राहणार आहे. सभापतीपद ईश्वर चिठ्ठीने का फोडाफोडीने निवड होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

MLA Manikrao Kokate,
Former MLA Rajabhau Waje,
Youth leader Uday Sangle
Nashik Bazar Samiti: सभापती, उपसभापती निवडणूक तत्काळ घ्या; नाशिक कृउबा समितीसंदर्भात उच्च न्यायालयाचे आदेश

उद्या निकाल लागणार

(दि. 18) बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होणार असून, सर्व १८ संचालकांना १२ वाजता बाजार समितीच्या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत अजेंडा दिलाअसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंध अर्चना सौंदाणे तसेच अधिकारी गायकवाड हे उपस्थित सभापती निवडणूक पार पडणार आहे

निवडणुकीच्या दिवशी काय करिष्मा घडतो..

या निवडणुकीत राजकीय घडामोडी काहीही घडू शकल्याने. शेवटच्या क्षणी काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .त्यातच दोन्ही गटाकडून सांगण्यात येत आहेत की आमचे संचालक आमच्या बरोबरच आहेत.

तरीही त्यांच्या प्रत्येक हालचालीवर प्रत्येक गटाकडून नजर ठेवण्यात आलेली असूनही. आमदार कोकाटे गटांचा एक संचालक सध्या नॉट रिचेबल असल्याची चर्चा दोन दिवसापासून घडत आहे. तरी निवडणुकीच्या दिवशी काय करिष्मा घडतो याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिलेले आहेत.

MLA Manikrao Kokate,
Former MLA Rajabhau Waje,
Youth leader Uday Sangle
Sinnar Bazar Samiti : सभापती, उपसभापती पदासाठी गुरूवारी निवडणुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()