Sinnar Bus Accident : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

National Highways Authority of India
National Highways Authority of Indiasakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पायी चालणाऱ्या साई भक्तांसाठी स्वतंत्र पालखीमार्गाची आखणी मुसळगाव ते सावळी विहीर फाट्यादरम्यान करण्यात येत आहे.

चौपदरीकरणाच्या कामात ठेकेदार मोंटेकारलो कंपनीकडून अनेकदा कोणती पूर्वसूचना न देता रस्ते सुरू अथवा बंद करून एकेरी वाहतूक सोडण्यात येते. (Sinnar Bus Accident National Highways Authority neglect of safety nashik news)

रस्ते बंद केल्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावण्याची गरज असते. मात्र ही बाब दुर्लक्षित होत असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे देखील प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाले आहे. पाथरे येथे घडलेल्या अपघातातदेखील हीच चूक झाली आहे. पाथरे गावाकडून वावीकडे येणारा मार्ग कंपनीकडून अचानक बंद करण्यात आला होता.

या ठिकाणी एका पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. मात्र, रात्रीच्या वेळी हा मार्ग खुला राहिला असता तर अपघात झाला नसता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. वास्तविक, कंपनीने दुरुस्तीचे कोणतेही काम दिवसा करणे आवश्यक आहे.

त्यामुळे वाहनचालकांना परिस्थिती लक्षात येते. रात्रीच्या वेळी सर्वजण याबाबत अनभिज्ञ असतात. अपघात घडल्यानंतर मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून बंद केलेला रस्ता तातडीने पूर्ववत खुला करण्यात आला होता.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

National Highways Authority of India
धावत्या इंजिन गाडीत विद्युत प्रवाह जाऊन गाडीला मिळणार विद्युतप्रवाह; मनमाड रेल्वे स्थानकात Sub Station!

दरम्यान, जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज सकाळी पाथरे परिसरात भेट देऊन अपघात स्थळाची पाहणी केली, तसेच पाथरे-पोहेगाव रस्ता, पाथरे गावातील बसस्थानक व स्कायवॉकबाबत माहिती घेतली.

पाथरे गावात स्कायऑफची गरज नसताना विनाकारण खर्च करण्यात आला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पाथरे गावात जनावरांना रस्ता ओलांडण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने महामार्ग ओलांडून पलीकडे जावे लागणार आहे.

National Highways Authority of India
Nashik News: सौरऊर्जा प्रकल्पासाठी चक्क वनजमिनीची खरेदी विक्री; व्यवहार रद्द करण्याची वनविभागाची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()