नाशिक : जिल्ह्यात १ ते ४ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमध्ये मालेगाव, देवळा, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी, सिन्नर या तालुक्यातील १२२ गावांमधील १४ हजार ७४० शेतकऱ्यांच्या ९ हजार ८२२ हेक्टर ५० आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. ढगफुटीसदृश्य स्थिती तयार झालेल्या सिन्नर तालुक्यातील ७६ गावांमधील ८ हजार ८८१ शेतकऱ्यांच्या ७ हजार १५१ हेक्टरवरील पिकांची दाणादाण उडवली आहे. कृषी विभागातर्फे नुकसानीचा हा प्राथमिक अहवाल काल सादर झाला. (Sinnar Flood News Loss of crops on 9822 hectares in heavy rain Nashik Latest Marathi News)
अतिवृष्टीमध्ये जिरायत क्षेत्रावरील ७ हजार ५२० हेक्टर ४० आर, तर बागायती क्षेत्रावरील २ हजार २१४ हेक्टर ७० आर पिकांना अन सीताफळ, डाळिंबाच्या ८७ हेक्टर ४० आरला दणका बसला आहे. सिन्नरच्या अगोदर इगतपुरी तालुक्यात ढगफुटीसदृश्य स्थिती तयार झाली होती. त्यात इगतपुरी तालुक्यातील २० गावांमधील १ हजार ५५७ शेतकऱ्यांच्या ६६८ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.
इतर तालुक्यात अतिवृष्टीमुळे आपत्तीग्रस्त गावे आणि त्यातील शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे असून (कंसात नुकसान झालेले पिकांचे क्षेत्र हेक्टरमध्ये दर्शवते) : मालेगाव-६- ४ हजार १५ (१ हजार ८४६), देवळा-१-२१ (१०), दिंडोरी-२-६ (३.५०), नाशिक-१७-२६० (१४४).
सोयाबीन, मक्याचे उत्पादन घटणार
जिल्ह्यातील अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. सोयाबीनचे ३ हजार ९६८ हेक्टर ९० आर वरील, तर त्याखालोखाल मक्याच्या १ हजार ९१३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय नाशिक तालुक्यातील ३ हेक्टर ५० आर, इगतपुरीमधील ६६४ हेक्टर, सिन्नरमधील ३८२ हेक्टर अशा एकूण १ हजार ४९ हेक्टर ५० आर क्षेत्रावरील भाताचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सोयाबीन, मका, भाताच्या उत्पादनात घट येणार आहे.
तालुकानिहाय बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये याप्रमाणे : मालेगाव : मका-१ हजार २९०, बाजरी-५०५, डाळिंब-५१. देवळा : मका-४, बाजरी-६. दिंडोरी : टोमॅटो-३.५०. नाशिक : सोयाबीन-६८.५०, भाजीपाला-५०.२०, डाळिंब-१.४०. इगतपुरी : टोमॅटो-४. सिन्नर : मका-६१९, भुईमूग-२०, सोयाबीन-३ हजार ९००, कापूस-८, बाजरी-५०, टोमॅटो-१५२, सीताफळ-१५, डाळिंब-२०.
पिकनिहाय बाधित क्षेत्र
(आकडे हेक्टरमध्ये दर्शवतात)
० भुईमूग-२०
० कापूस-८
० बाजरी-५६१
० टोमॅटो-१५९.५०
० भाजीपाला-२०५५.३०
० सीताफळ-१५
० डाळिंब-७२.४०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.