Sinnar Group Fight Case : 'त्या' जखमी तरुणाच्या मृत्यूनंतर सिन्नरला तणाव

Sub Divisional Police Officer Somnath Tambe appealing to the angry citizens gathered at Vaiduvadi to maintain peace.
Sub Divisional Police Officer Somnath Tambe appealing to the angry citizens gathered at Vaiduvadi to maintain peace.esakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : शहरात शनिवारी (ता.८) सायंकाळी गंगावेस भागात मळहद्द व वैदूवाडी येथील तरुणांच्या दोन गटांत झालेल्या तुफान हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या शंकर मल्लू माळी या वैदूवाडीतील तरुणाचा आज (ता.१३) मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सिन्नर शहराच्या विविध भागात सकाळपासूनच तणावाचे वातावरण होते.

पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वैदूवाडीतील म्हसोबा मंदिरासमोर प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करत रहिवाशांना शांतता राखण्याचे आवाहन केले. गुन्हा दाखल झालेल्या संशयित हल्लेखोरांना २४ तासात अटक करण्यात येईल असे आश्वासन श्री. तांबे यांनी दिले. दरम्यान यानंतर दुपारी सिन्नरच्या अमरधाममध्ये शंकरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Sinnar Group Fight Case Tension in Sinnar after death of injured youth Nashik Latest Crime News)

दसऱ्याच्या दिवशी झालेल्या किरकोळ भांडणाच्या वादातून शनिवारी सायंकाळी गंगावेशीबाहेरच्या आठवडे बाजारात गाडे मळा, मळहद्द व वैदूवाडी येथील शंभर सव्वाशेच्या आसपास संख्येने तरुण एकमेकांना भिडले होते. त्यात शंकर माळी याच्यासह आणखी दोन युवक जखमी झाले होते. माळी याच्या पोटात धारदार शस्त्राच्या वारमुळे इजा झाल्याने त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

त्याचे निधन झाल्याचे समजल्यावर वैदूवाडी येथील रहिवाशांमध्ये तीव्र संताप उमटला. वाडीतील पुरुष मंडळी महिला व लहान मुले देखील म्हसोबा मंदिरासमोर एकत्र जमा झाले. गुन्हा दाखल करूनही पोलिसांकडून हल्लेखोरांना अटक न करणे व त्यांना अभय देत असल्याचा आरोप करून पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हल्लेखोरांना अटक होईपर्यत शंकरचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा तसेच त्याच्यावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय वैदूवाडी येथील रहिवाशांनी घेतला. त्यामुळे शहराच्या मुख्य पेठेतही तणावाचे वातावरण निर्माण झाले. निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी सिन्नरला धाव घेत गंगावेस, वैदूवाडी व मळहद्द भागात जादा कुमक तैनात करण्यात आली.

रहिवासी मोर्चा काढच असल्याचे समजल्यावर श्री. तांबे यांनी वैदुवाडीत धाव घेत प्रमुख कार्यकर्ते तसेच रहिवाशांशी संवाद साधला. सर्वांची मनधरणी करत अंत्यविधी न रोखण्याची विनंती केली. घटनेच्याच दिवशी संशयितांविरोधात गुन्हा दाखल असून तपासासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. येत्या २४ तासात सर्व संशयित हल्लेखोरांना अटक करण्यात येईल असे आश्वासन श्री. तांबे यांनी शंकरचा भाऊ रामा माळी यांना सर्वांसमक्ष दिले.

Sub Divisional Police Officer Somnath Tambe appealing to the angry citizens gathered at Vaiduvadi to maintain peace.
SAKAL Exclusive : सावधान! 5G SIM Updateच्या नावाने बसतोय गंडा

शांततेसाठी सहकार्यच पण...

वैदू समाजातील कार्यकर्त्यांनी देखील सामाजिक शांतता अबाधित राखण्यासाठी आमचे नेहमीच सहकार्य असल्याचे सांगितले. कुठलीही शहनिशा न करता समोरच्या गटाने केवळ अफवांवर विश्वास ठेवून वैदूवाडीतील तरुणांवर हल्ला केला व त्यात शंकरचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही घटना निषेधार्ह असल्याचे सांगत पोलिसांनी कोणाला पाठीशी न घालता हल्लेखोरांना अटक व कठोर शिक्षा करावी अशा मागणीचे निवेदन वैदू समाज बांधवांकडून पोलिसांना देण्यात आले.

त्यानंतर पोलीस पथकासह नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नाशिकला रवाना झाले. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सिन्नर येथील अमरधाममध्ये शंकरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, एमआयडीसीचे निरीक्षक दशरथ चौधरी, वावीचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते, लासलगावचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
शनिवारी रात्रीपासून दंगा नियंत्रण पथकाची एक सशस्त्र तुकडी देखील सिन्नरला तळ ठोकून आहे.

आठ जणांविरोधात गुन्हा

शनिवारी घडलेल्या हाणामारीच्या घटनेनंतर त्याच दिवशी रात्री उशिरा एकनाथ धनगर (रा. वैदूवाडी) यांच्या तक्रारीवरून मोहन ऊर्फ पप्पू उगले, अनिल गाडे, गणेश तटाणे, ज्ञानेश्वर गाडे, दौलत तटाणे, अक्षय उगले, आकाश उगले, पप्पू लोखंडे (सर्व रा. मळहद्द, सिन्नर), सौरभ नाठे (रा. कुंदेवाडी) यांच्यासह ७ ते ८ अनोळखींविरोधात सिन्नर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दंगा व गंभीर दुखापत करणे या अंतर्गत सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, वरील सर्व संशयित फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Sub Divisional Police Officer Somnath Tambe appealing to the angry citizens gathered at Vaiduvadi to maintain peace.
Nashik Crime News : तलावडी भागातील अनधिकृत गॅस भरणा केंद्र उद्‌ध्वस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.