Nashik News : सिन्नर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत गुरुवारी (ता.२०) माघारीच्या शेवटच्या दिवशी ११३ इच्छुकांनी माघार घेतली असून एकूण १२४ जणांनी माघार घेतल्याने १८ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. (Sinnar Market Committee BJP MNS challenge to traditional competitors Public Service Panel Against Peasant Development nashi news)
विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, माजी जि.प.सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनेल आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवानेते उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा परिवर्तन पॅनेल या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांविरोधात भाजपा,
मनसे आघाडीने भाजपचे तालुका प्रभारी जयंत आव्हाड, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या नेतृत्वाखाली बळीराजा विकास पॅनेलमध्ये लढत होत आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत गटातून सर्वसाधारण जागेसाठी शरद आनंदराव गुरुळे हे अपक्ष उमेदवार नशिब आजमावत आहेत.
शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार
सोसायटी सर्वसाधारण गटातून शशिकांत गणपत गाडे, भाऊसाहेब रामराव खाडे, अनिल दशरथ शेळके, रवींद्र सूर्यभान शिंदे, विनायक हौशिराम घुमरे, आबासाहेब विठ्ठल जाधव, ज्ञानेश्वर विठ्ठल हारळे, महिला राखीव गटातून सिंधूबाई केशव कोकाटे, सुरेखा ज्ञानेश्वर पांगारकर,
इतर मागास प्रवर्गातून संजय वामन खैरनार, विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातून रामदास मारुती जायभावे, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून पंढरीनाथ धर्माजी ढोकणे, भाऊसाहेब नाना नरोडे अनु.जाती-जमाती गटातून दीपक तुकाराम जगताप,
आर्थिक दुर्बल गटातून जगदीश देवराम कुऱ्हे, व्यापारी गटातून जगन्नाथ गंगाधर खैरनार, विजय रामनाथ तेलंग, हमाल मापारी गटातून नवनाथ शिवाजी नेहे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जनसेवा परिवर्तन पॅनलचे उमेदवार
सोसायटी सर्वसाधारण गटातून शरद ज्ञानदेव थोरात, सोमनाथ गंगाधर जाधव, शरद उमाजी गिते, जालिंदर जगन्नाथ थोरात, योगेश रंगनाथ माळी, शिवनाथ कचरु दराडे, रघुनाथ एकनाथ आव्हाड, महिला राखीव गटातून सुनीता छबू कदम,
ताराबाई बहिरू कोकाटे, इतर मागास प्रवर्गातून शिवाजी विठोबा खैरनार, विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातून नवनाथ प्रकाश घुगे, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून डॉ. रवींद्र रामनाथ पवार, श्रीकृष्ण मारुती घुमरे,
अनु.जाती-जमाती गटातून गणेश भिमा घोलप, आर्थिक दुर्बल गटातून प्रकाश पोपट तुपे, व्यापारी गटातून सुनील बाळकृष्ण चकोर, रवींद्र विनायक शेळके, हमाल मापारी गटातून किरण सुभाष गोसावी आदींना उमेदवारी देण्यात आली आहे.
बळीराजा विकास पॅनेलचे उमेदवार
सोसायटी सर्वसाधारण गटातून ज्ञानेश्वर रामचंद्र कुर्हाडे, अनिल रंगनाथ शिंदे, महिला राखीव गटातून यमुनाबाई महादू आव्हाड, इतर मागास प्रवर्गातून बहिरू नामदेव दळवी, विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातून मीराबाई सुदाम सानप,
ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून दिलीप बंडू केदार, अनु.जाती-जमाती गटातून राजेंद्र दादा कटारनवरे, व्यापारी गटातून नंदकुमार दत्तात्रेय जाधव आदींना उमेदवारी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.