Sinnar Market Committee Election : सिन्नर बाजार समिती कोकाटे अन् वाजे-सांगळे गटांना समान 9 जागा

Sinnar Market Committee Election
Sinnar Market Committee Electionesakal
Updated on

Sinnar Market Committee Election : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल व माजी आमदार राजाभाऊ वाजे-उदय सांगळे समर्थक गटाच्या जनसेवा परिवर्तन पॅनलला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. तर भाजप पुरस्कृत बळीराजा विकास पेनलसह अपक्षांना एकही जागा मिळाली नाही.

बाजार समिती च्या निवडणुकीचा निकाल अतिशय धक्कादायक लागला असून यामुळे राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानल्या गेलेल्या सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Sinnar Market Committee election Kokate and Waje Sangle groups have 9 seats nashik news)

सिन्नर बाजार समितीत गेल्या वीस वर्षांपासून आमदार माणिकराव कोकाटे यांचे नेतृत्वाखालील गटाची सत्ता होती. मात्र या सत्तेला सुरुंग लावण्याचा चंग या निवडणुकीत माजी आमदार राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांच्या गटाने बांधला होता.

कोकाटे गटाचे मनसुबे उधळून लावण्यासाठी वाजे सांगळे गटाने आखलेल्या व्यूहरचनेला या निवडणुकीत यश आल्याचे बघायला मिळाले. दोनही गटांकडून अतिशय चुरशीची लढत दिली गेली असली तरी समान नऊ जागांवर उमेदवार निवडून आल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी घोडेबाजार रंगणार यात शंकाच नाही.

सुरुवातीपासूनच मतमोजणीत कोकाटे गट आघाडीवर असला तरी वाजे गटाकडून देखील ठोस आव्हान देण्यात आल्याचे दिसून येत होते. सोसायटी मतदार संघात सर्वसाधारणच्या पाच जागांवर शेतकरी विकासचे भाऊसाहेब खाडे (603), शशिकांत गाडे (601),अनिल शेळके (590), रवींद्र शिंदे (589), विनायक घुमरे (589) हे विजयी झाले.

तर ज्ञानेश्वर हारळे (568), आबासाहेब जाधव (576) यांना धक्कादायक रित्या पराभव पत्करावा लागला. याच गटात जनसेवाचे शरद थोरात (603), जालिंदर थोरात (597) हे दोघे उमेदवार विजयी झाले. तर सोमनाथ जाधव (551) , शरद गीते (581), योगेश माळी (572), शिवनाथ दराडे (574), रघुनाथ आव्हाड (563) यांचा पराभव झाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Sinnar Market Committee Election
Nashik Krushi Utpanna Bazar Samiti Election : नाशिक बाजार समितीची निवडणूक, शेतकऱ्यांना नेमकं काय हवं?

महिला राखीव गटात शेतकरी विकासचे दोनही उमेदवार विजयी झाले. सिंधुबाई कोकाटे (623), सुरेखा पांगरकर (616 ) यांनी जनसेवाच्या सुनिता कदम (592), ताराबाई कोकाटे (591) यांचा पराभव केला.

भटक्या जमाती विमुक्त जाती गटातून जनसेवा च्या नवनाथ घुगे (625) यांनी बाजी मारली तर शेतकरी विकास चे रामदास जायभावे (605) यांचा पराभव केला. इतर मागास प्रवर्ग गटात शेतकरी विकास चे संजय खैरनार (629 ) विजयी झाले तर जनसेवाच्या शिवाजी खैरनार (604) यांचा पराभव झाला.

ग्रामपंचायत मतदारसंघात चारही जागांवर जनसेवाचे उमेदवार निवडून आले. सर्वसाधारण प्रवर्गात डॉ. रवींद्र पवार (503), श्रीकृष्ण घुमरे (532) यांनी शेतकरी विकासच्या पंढरीनाथ ढोकणे (472), भाऊसाहेब नरोडे (465) यांना पराभवाची धूळ चारली.

आर्थिक दुर्बल प्रवर्गातून प्रकाश तुपे (557) यांनी शेतकरी विकासच्या जगदीश कुऱहे (459) यांचा पराभव केला. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात गणेश घोलप (547) यांनी शेतकरी विकासच्या दीपक जगताप (469) यांना रोखले.

व्यापारी मतदारसंघात शेतकरी विकासच्या जगन्नाथ खैरनार (70), विजय तेलंग (66) यांना रोखत जनसेवाचे सुनील चकोर (95), रवींद्र शेळके 79 निवडून आले. तर हमाल व तोलारी गटात शेतकरी विकासच्या नवनाथ नेहे (219) यांनी जनसेवाच्या किरण गोसावी (122) यांचा पराभव केला.

वाजे गटाकडून फेर मतमोजणीचा अर्ज....

सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारण गटात जनसेवा पॅनलचे तीन तर शेतकरी विकासचे पाच उमेदवार निवडून आले. या गटातील निकालावर आक्षेप घेत माजी आमदार वाजे गटाकडून फेर मोजणीची मागणी करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अर्चना सौंदाणे यांनी या संदर्भात विहित नमुन्यातील अर्ज व निर्धारित केलेले शुल्क भरण्याची सूचना केली. त्यानुसार वाजे गटाकडून कार्यवाही करण्यात आल्यानंतर रात्री अकरा वाजेच्या सुमारास सोसायटी मतदारसंघातील सर्वसाधारण गटासाठी फेर मतमोजणी सुरू करण्यात आली होती. परंतू फेर मतमोजणीत काहीही निष्पन्न झाले नाही.

Sinnar Market Committee Election
Malegaon Market Committee Election : मालेगावला उत्साह अन् शांततेत मतदान; मतमोजणीकडे जिल्ह्याचे लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.