Nashik Bribe Crime : सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी गागरे लाच लुचपतच्या जाळ्यात; 50 हजारांची लाच घेताना अटक

annasaheb gagre
annasaheb gagreesakal
Updated on

Nashik Bribe Crime : कृषी यंत्र व अवजारे उत्पादित करणाऱ्या कारखानदाराकडून त्याने शेतकऱ्यांना वितरित केलेल्या उत्पादनांवर सरकारी सबसिडी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सिन्नरचे तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब हेमंत गागरे यांना शुक्रवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. (Sinnar taluka agriculture officer Gagare Arrested while accepting bribe of 50 thousand Nashik Crime news)

सिन्नर येथे तालुका कृषी अधिकारी पदावर कार्यरत असलेले अण्णासाहेब गागरे वय 42 यांच्याकडे निफाड तालुक्याचा देखील अतिरिक्त पदभार आहे. तक्रारदार यांचा सिन्नर एमआयडीसी येथे शेती यंत्र व अवजारे उत्पादित करण्याचा कारखाना आहे.

त्यांनी शेतकऱ्यांना वितरित केलेल्या शेती यंत्र व अवजारांवर शासनाच्या कृषी विभागाकडून अनुदान वितरित करण्यात येत असते. परंतु श्री. गागरे यांनी तक्रारदाराकडून उत्पादित केलेली यंत्रे ही अनुदानास पात्र नसल्याचे भासवून त्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या यंत्रावर कृषी विभागाकडून अनुदान मिळवून देण्याकरिता चार लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

तडजोडी अंती दोन लाख रुपये घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. व त्यातील पहिला हफ्ता पन्नास हजार रुपये स्वीकारताना शुक्रवारी सायंकाळी श्री. गागरे यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

annasaheb gagre
Jalgaon Bribe News : ‘महावितरण’च्या तंत्रज्ञासह पंटरला लाच घेताना पकडले

सायंकाळी सहा वाजेपर्यंत श्री. गागरे हे सिन्नर येथील कृषी विभागाच्या कार्यालयात त्यांच्या दालनात बसून होते. सायंकाळपर्यंत तालुक्यातील कृषी अधिकारी व पर्यवेक्षकांची बैठक आटोपल्यानंतर ते बाहेर निघून गेले होते.

सापळ्याची कारवाई झाल्याचे समजल्यावर कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र , रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणालाही माहिती मिळत नव्हती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधिक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

annasaheb gagre
Nashik Fraud Crime : रोलेट प्रकरणी एकाची साडेचार लाखांची फसवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.