सिन्नर : शहरात वाहनांची वाढती संख्या, रस्त्यावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमणे व बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याची आराखड्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (Sinner becoming traffic town Unruly parking on roads traffic jams on Nashik Way MP bridge Nashik News)
सिन्नर शहर उद्योगनगरी म्हणून ओळखली जाते. शहरात प्रसिद्ध मंदिरे आहेत. गोंदेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. पर्यटक वाहने घेऊन येतात. शहरात अनेक उपनगरे झाले असून, तेथील नागरिक मुख्य बाजारात दुचाकी, कार घेऊन येतात.
ग्रामीण भागातील लोक खरेदीसाठी वाहनाने शहरात येत असल्याने त्याचा वाहतुकीवर ताण पडतो. दर शनिवारी व रविवारी खासदार पूल व नाशिक वेसमध्ये वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, गंगाधर टॉकीज समोर, भैरवनाथ मंदिर परिसरात, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवा पूल, लाल चौक, बसस्थानक परिसरात प्रामुख्याने वाहतुकीची प्रचंड समस्या भेडसावते.
त्यामुळे पादचारी व सायकलवरून जाणाऱ्या नागरिकांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते. अरुंद रस्ते, त्यातच वाहनतळाची सोय नसल्याने बहुतेक वाहने रस्त्यावर उभी असतात. अनेक ठिकाणी रस्त्यावर व्यवसायिकांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडचण होते.
भाजी मंडईत येणाऱ्या वाहनधारकांना शिस्त लावण्याची गरज आहे. यावर उपाय म्हणून काही ठिकाणी एकेरी वाहतूक, प्रवेशबंद, पार्किंग, जड वाहनांना प्रवेशबंद आवश्यक आहे. प्रत्येक वेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला, की त्यावर फक्त चर्चा होते.
मात्र, पुढाकार कोणीच घेत नाही. वाहतूक कोडींवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित प्रशासनाने तत्काळ मार्ग काढणे गरजेचे आहे. सिन्नर शहरात मुख्यत: प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे.
दिवसेंदिवस चोरटे सौभाग्याचे लेणे चोरून नेत आहेत. रविवारच्या बाजारात नागरिकांचे मोबाईल हातोहात चोरटे लंपास करीत आहेत. हाकेच्या अंतरावर दोन्ही पोलिस ठाणे असूनही चोरट्यांचे फावले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
"संबंधित प्रशासनाने वाहतुकीचा प्रश्न निकाली काढावा. शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीतून जावे लागत आहे. पालिकेने रस्त्यावर आवश्यक तेथे पांढरे पट्टे मारावेत व फलक लावावेत. ट्रॅफिक वॉर्डबॉय उपलब्ध करून द्यावेत. नागरिकांनी नियमांचे पालन करण्याची स्वयंशिस्त लावली, तरच वाहतूक कोंडीची समस्या सुटेल. नागरिकांनी दुचाकी, कार योग्य ठिकाणी लावावी. त्यामुळे वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होईल."-कृष्णाजी भगत, मविप्र संचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.