Nashik Crime: सिन्नरला गुटख्यासह देशी दारू जप्त; एकाला अटक, दुसरा संशयित फरार

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Nashik Crime : शहरातील गणेशपेठ भागासह मुसळगाव एमआयडीसी परिसरात छापा टाकून सिन्नर व एमआयडीसी पोलिसांनी हजारो रुपयांचा गुटखा व देशी दारू जप्त केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून दुसरा संशयित फरार झाला आहे. (Sinner seized country liquor with gutkha One arrested second suspect absconding Nashik Crime)

गणेश पेठेतील रेणुका ट्रेडर्स या दुकानात बेकायदा गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती सिन्नर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस कर्मचारी अंकुश दराडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता.९) दुपारच्या सुमारास दुकानात छापा टाकून तपासणी केली.

यावेळी दुकानातून ४ हजार ४४० रुपयांचा हिरा पानमसाला, २८८० रुपयांची राज निवास सुगंधी तंबाखू, १७८२ रुपयांचा विमल पानमसाला, १३९२ रुपयांचा जाफरामी जर्दा व जवळपास ४ हजारांची वेगवेगळ्या कंपन्यांची सुगंधी तंबाखू असा एकूण १४ हजार ६८६ रुपयांचा पानमसाला व सुगंधी तंबाखु जप्त केली आहे.

अंकुश दराडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुकानदार राकेश विजय क्षत्रिय (२८, रा. रेणुकानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे. सिन्नरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक रामदास धुमाळ तपास करत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Mumbai Crime : वृद्धाश्रमातील मनोरुग्ण महिलेचा खून, स्टीलच्या ताटाने हल्ला

हातगाड्यावरही गुटखा जप्त

मुसळगाव औद्योगिक वसाहत परिसरात शिर्डी महामार्गालगत असलेल्या एका हातगाड्यावरून ५८५९ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. पोलिस कर्मचारी स्वप्निल पवार यांच्यासह पथकाने गाड्यावर छापा टाकला.

त्यावेळी पोलिसांना प्लास्टिकच्या गोणीमध्ये १४०० रुपयांची देशी दारू, २३०० रुपयांचा हिरा पानमसाला व २१०० रुपयांची वेगवेगळ्या कंपनीची सुगंधी तंबाखू असा एकूण ५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संशयित राकेश गोकुळ पाटील (रा. उज्जलनगर, सिन्नर) हा फरार झाला. पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार टेमगर तपास करत आहेत

Crime News
Karad Crime : कॉलेजच्या पाठीमागं सापडला सडलेला मानवी सांगाडा; राजमाचीत खळबळ, फॉरेन्सिक टिमकडून पाहणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.