Nashik Crime News : साडेसहा लाखाची रोकड चोरटे उपनगर पोलिसांच्या जाळ्यात!

upanagar police with the arrested suspects.
upanagar police with the arrested suspects.esakal
Updated on

नाशिक रोड : श्रीरामपूर (जि. नगर) येथून गाडीची काच फोडून साडेसहा लाखांची रोकड पळवून आणलेल्या चोरट्यांना उपनगर पोलिसांनी नाशिक रोड येथे शिताफीने अटक केली. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. (six half lakh cash thieves in custody of upanagar police Nashik Crime News)

उपनगर गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक विकास लोंढे हे सहकरी कर्मचारी संजय ताजणे, विनोद लखन, सूरज गवळी, पंकज कर्पे, राहुल जगताप, संदेश रघतवान यांच्यासह मुक्तिधाम परिसरात गस्त घालत होते.

या वेळी लाल काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर लखन बाळू पवार (रा. देवी मंदिराजवळ, निफाड), श्रीनिवास अशोक बोरजे (रा. पिंपळगाव जलाल, येवला) व गौरव राजीव पवार (रा. कुंदेवाडी, निफाड) हे संशयितरीत्या दिसले.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

upanagar police with the arrested suspects.
Jindal Fire Accident : जिंदालमधील आग 60 तासांनंतर आटोक्यात; मातीचे ढिगारे उपसण्याचे काम सुरू

त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते पळू लागले. गुन्हे शोध पथकाने त्यांचा पाठलाग करत त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर यांनी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी श्रीरामपूर येथील नीतू ढाबा, प्रभात डेअरीजवळ एका चारचाकी वाहनाची मागील काच फोडून गाडीतील ६ लाख ४२ हजार रुपये चोरल्याची कबुली दिली.

कामगिरीबद्दल आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ नीलेश माईनकर, निरीक्षक विजय पगारे, पंकज भालेराव यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.

upanagar police with the arrested suspects.
Nashik News : जिल्हयात गुटखा बंदीच्या नावाखाली दुप्पट ते तिप्पट दराने विक्री!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.