Nashik News: यात्रा-जत्रांमधून ग्रामीण अर्थकारणाचे फिरू लागले चक्र! वर्षभराच्या रोजी-रोटीची व्यवस्था

जुन्या काळातील तमाशा फडाची जागा आता ऑर्केस्ट्राने घेतली असली, तरी जत्रा आणि तमाशा यांचे नाते अतूट आहे.
The crowd at the first full fair.
The crowd at the first full fair.esakal
Updated on

Nashik News : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या यात्रा-जत्रांचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असून अनेक छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायांना बळ मिळत आहे. जत्रा-यात्रांमुळे फिरत्या व्यावसायिकांच्या वर्षभराच्या रोजीरोटीची सोय होत आहे. एवढेच नव्हे, तर जत्रा ग्रामीण बाज टिकविण्याचा प्रयत्न करीत अर्थकारणाचे चक्र फिरण्यास मदत होऊ लागली आहे.

तमाशा, रथोत्सव, बारागाड्या ओढणे, बैलगाडी शर्यत, कुस्त्यांचे फड याचे कोंदण यात्रा-जत्रांना आहे. मिठाई, खेळणी, आभूषण, भांडी, लाकडी व प्लास्टिक वस्तूंची दुकाने थाटण्यात आली आहेत. (Small and big industries and businesses are getting Financial strength due to Yatra Jatra nashik news)

पाळणे, चक्री-रहाट, ‘डान्स स्टेज’ आणि इतर लहान-मोठी मनोरंजनाची साधनांना त्यानिमित्ताने गावांमधून मागणी वाढली आहे. या सर्व व्यवसायांमधून हजारो तरुणांच्या हाताला काम मिळत असल्याने जवळपास चार ते पाच महिने व्यावसायिक गावोगाव फिरतात.चार-पाच महिने अनेक छोटे व्यावसायिक गावोगावी फिरताना दिसतात.

जुन्या काळातील तमाशा फडाची जागा आता ऑर्केस्ट्राने घेतली असली, तरी जत्रा आणि तमाशा यांचे नाते अतूट आहे. तमाशा रात्रभर ग्रामस्थांचे मनोरंजन करतात आणि सकाळी पुन्हा हजेरीत कला दाखवत आपली बिदागी घेतात. त्यामुळे या कलाकारांसाठी जत्रांचा हंगाम महत्त्वाचा असतो. यात्रांच्यानिमित्ताने ग्रामस्थ एकत्रित येऊन, वर्गणी जमा करीत करमणुकीचे कार्यक्रम घेण्यास प्राधान्य देत आहेत.

बैलगाडा शर्यत, कुस्त्या घेत विजयश्री मिळवणाऱ्यांवर बक्षिसांची खैरात केली जात आहे. सर्वाधिक उलाढाल खाद्यपदार्थांमध्ये होत आहे. गरम जिलेबी, गुडीशेव, भेळभत्ता, बुंदीचे लाडूंना सर्वाधिक मागणी आहे. नारळासह इतरही साहित्याची व खेळण्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. मधल्या काळात, कोरोनामुळे जत्रा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती.

The crowd at the first full fair.
Nashik News : बाबाजींच्या कृपेने मिळाली जगण्याची ‘दृष्टी’; धर्मसोहळ्यात सलीम पठाणने उलगडला जीवनपट

वाखारीमध्ये लाखोंची उलाढाल

वाखारी (पि) (ता. देवळा) येथे खंडेराव महाराज मंदिर जीर्णोद्धाराच्यानिमित्ताने चंपाषष्ठीला जत्रा उत्सव झाला. पहिल्यांदाच भरविण्यात आलेल्या जत्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. कीर्तन, तमाशा, जागरण-गोंधळ, बारागाड्या ओढणे, कुस्त्या, मिठाईची दुकाने, पाळणे व इतरही व्यावसायिकांची दुकाने अशी तीनदिवसीय जत्रेत रेलचेल राहिली. जत्रेनिमित्त चाकरमानी बाहेरगाव, शहरांमधून मोठ्या संख्येने गावाकडे आले होते.

मोठ्या जत्रांची गावे

मोठ्या जत्रांची जिल्ह्यातील गावे अशी : उमराणे, देवळा, वडाळीभोई, ओझर, सटाणा, कळवण, डांगसौंदाणे, नामपूर, चंदनपुरी, वाखारी-पिंपळगाव, विठेवाडी, दहिवड, मेशी, खुंटेवाडी, भऊर, कनाशी आदी.

"यात्रेनिमित्त मिठाईची खरेदी-विक्री जोरात होते. आबाल-वृद्ध आणि सासूरवाशीण-माहेरवाशीण गोड पदार्थांचा आस्वाद घेतात. इतरही वस्तूंची खरेदी केली जाते. त्यामुळे व्यवसाय वृद्धीसाठी जत्रा महत्त्वाची भूमिका बजावतात." - दिलीप गांगुर्डे, पिंपळगाव (वा)

"खरीप हंगामात केलेल्या कामाची बक्षिसी म्हणून लहान-मोठ्या साऱ्यांनाच जत्रेसाठी मोकळ्या मनाने खर्च द्यावा लागतो. त्यामुळे पुढील कामांना साऱ्यांनाच बळ मिळते. जत्रा-यात्रा एक प्रकारे ऊर्जा पेरतात." - दीपक वाघ, डांगसौंदाणे (ता. बागलाण)

The crowd at the first full fair.
NMC Fraud News: ओटीपी’ प्रणालीअभावी महापालिकेची फसवणूक; कर्मचाऱ्यांच्या हाती लाखोंची रोकड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.