Nashik News : गोदाघाटावर सौंदर्याऐवजी बकालपणा; स्मार्ट कामांचा बोजवारा

smart city degraded work near godavari river nashik news
smart city degraded work near godavari river nashik newsesakal
Updated on

Nashik News : केंद्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘स्मार्टसिटी’ कंपनीतर्फे गोदाघाटावर कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली.

यातून घाटाला किती सौदर्य प्राप्त झाले हा संशोधनाचा भाग असला तरी पूर्ण झालेल्या कामांच्या गुणवत्तेचे पितळ बाहेर पडताना दिसत आहे. नदीच्या दुतर्फा लावलेल्या नक्षीदार बॅलार्ड (स्तंभ) कोलमडून पडले आहे, तर पायऱ्यांच्या फरशाही हातोहात लांबविल्या जात आहे. (smart city degraded work near godavari river nashik news)

गत दोन वर्षांपासून शहराच्या विविध भागांसह गोदाघाटावर स्मार्टसिटी कंपनीकडून घाटाच्या सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. यात घाटाच्या दुतर्फा फरशा बसविण्यासह नवीन पायऱ्या, पात्राच्या दुतर्फा ठराविक अंतरावर दीपस्तंभ, तुटलेल्या मंदिरांना पुन्हा सौदर्य प्राप्त करून देणे आदी कामांचा समावेश आहे.

त्यासाठी जवळपास साठ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. यातील बहुतांश कामे पूर्णत्वाला गेली, परंतु पूर्ण झालेल्या कामांचा बोजवारा उडताना दिसतं आहे. गटारांवरील ढाप्यांसह नदीच्या दुतर्फा लावलेले नक्षीदार व सुंदर बोलार्डची मोडतोड सुरू झाली आहे. या स्तंभांना बसविण्यात आलेल्या साखळ्यादेखील लांबविण्याचे प्रकार होत असल्याने सौंदर्यात भर पडण्याऐवजी बकालपणात भर पडली आहे.

गर्दुल्यांची दहशत

गोदाघाटावर मोठ्या प्रमाणावर व्यसनी, भिकारी, गर्दुल्ले यांचे वास्तव्य आहे.

smart city degraded work near godavari river nashik news
Nashik Dengue Disease : शहरात डेंगीच्या रुग्णसंख्येत वाढ

त्यांच्याकडून नशेसाठी पैसे उपलब्ध करण्यासाठी ढापे, साखळ्या, फरशा चोरल्या जात असून अटकाव केल्यास थेट शिवीगाळ, मारहाण करण्यापर्यंत संबंधितांची मजल जाते, त्यामुळे अनेकजण तोडफोड पाहूनही त्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय गत्यंतर नाही.

"तोडफोडीबाबत सर्वेक्षण करून माहिती घेऊ. गोदाघाटावरील सर्वच कामांचे दायित्व पुढील पाच वर्षे ठेकेदारावर आहे. त्यामुळे कोणत्याही कामाची तुटफूट झाल्यास अशी कामे पूर्ण करणे ठेकेदाराचीच जबाबदारी आहे." - सुमंत मोरे, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी.

"जनतेच्या कराच्या पैशातून उभ्या राहिलेल्या विकासकामांमुळे खरेतर शहराच्या सौदर्यांत भरच पडते. परंतु समाजहिताविरोधात काम करणारांना हे बघवत नाही. मात्र या लोकांवर दंडात्मक कारवाई होणे गरजेचे आहे." - विलास गावंजे, स्थानिक नागरिक.

"गोदाघाटावर सुरू असलेही ही कामे किरकोळ पैशांसाठी तोडली जात आहे. पोलिसांनी रात्रीच्या गस्तीच्या वेळी गोदाघाटावर गस्त घालताना या गोष्टींकडेही लक्ष दिल्यास अटकाव बसेल." - दत्ता पवार, संचालक, समाधान रसवंती.

smart city degraded work near godavari river nashik news
Nashik News : बाजार समिती सचिव अरुण काळे बडतर्फ; कर्तव्यात कसूर भोवला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.