Smart City Road : जलवाहिनी टाकण्यासाठी स्मार्ट रस्त्याची पुन्हा तोडफोड

reference image
reference imageesakal
Updated on

नाशिक : अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या स्मार्टसिटी कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या स्मार्ट रस्त्याची आता जलवाहिनी टाकण्यासाठी तोडफोड केली जाणार असल्याने स्मार्ट रस्ता आता नव्याने चर्चेत आला आहे. (Smart City Road Sabotage of smart road again to lay aqueduct Nashik Latest Marathi News)

स्मार्टसिटीअंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा १.१ किलोमीटरचा रस्ता तयार करण्याचे नियोजन २०१७ मध्ये करण्यात आले होते. मग रस्त्याची आवश्यकता नसताना व शहरात स्मार्ट पायलट रस्त्यासाठी अनेक महत्त्वाचे रस्ते असताना नेमका हाच रस्ता स्मार्ट रस्ता म्हणून हाती घेण्यात आल्याने वादाचा मुद्दा ठरला होता. त्याला कारण म्हणजे या भागात सरकारी कार्यालय, न्यायालय तसेच शाळा व महाविद्यालय असल्याने व बाजारपेठेचा मुख्य भाग असल्याने नागरिकांचे हा रस्ता स्मार्ट करण्यास विरोध होता.

त्यापूर्वी मुळात हा रस्ता सुस्थितीत असताना तोडण्याची गरज काय, असा प्रश्न नाशिककरांकडून विचारला गेला. १७ कोटी रुपयांच्या रस्त्याची किंमत तब्बल २१ कोटी रुपयांवर पोचल्याने वाद निर्माण झाला होता. मुदतीत काम न झाल्याने ठेकेदाराला दंड करण्यात आला, मात्र कालांतराने दंडाची रक्कमदेखील माफ करण्यात आली. रस्ता संपूर्णपणे तयार झाल्यानंतर रस्त्यांवरून प्रवास करताना रोलर कोस्टरचा अनुभव नागरिक घेत आहे.

reference image
Diwali Festival 2022 : यंदा भेटवस्तू खरेदीस दमदार प्रतिसाद!

इथपर्यंत वाईट प्रतिक्रिया नागरिकांच्या असताना आता जलवाहिनी टाकण्यासाठी तोडफोड केली जाणार आहे. मुळात स्मार्ट रस्ता तयार करताना विविध प्रकारच्या केबल सायकल ट्रॅक जलवाहिनीसाठी नियोजन केल्याचा दावा करण्यात आला होता. आता स्मार्ट रस्त्याची तोडफोड होणार असेल तर हा दावा फोल ठरला असून, यानिमित्ताने नाशिककरांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे.

"गावठाण भागात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी फुटपाथ खोदला जाणार आहे. गावठाण पाणीपुरवठा योजनेसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद आहे. यातून दीक्षित वाडा व गोल क्लब येथे दोन जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे."

- सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्टसिटी कंपनी.

reference image
Surya Grahan : लक्ष्मीपूजनाच्‍या पुढच्‍या दिवशी सूर्यग्रहण; 27 वर्षांनंतर दिवाळीत ग्रहण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.