शेतकऱ्याचे कांदा साठवणुकीसाठी स्मार्ट तंत्र!

smart storage system for onion
smart storage system for onione-sakal
Updated on
Summary

सामान्य शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीसाठी कमी खर्चात कांदा जास्त टिकून राहावा, यासाठी नावीन्यपूर्ण लोखंडी तारेच्या गोलाकार चाळीत कांदा साठवणुकीला प्राधान्य दिले आहे.

जुनी शेमळी (जि. नाशिक) : कोरोनाचा प्रादुर्भाव (corona virus) व लॉकडाउनमुळे (Lockdown) काढलेला कांदा साठवणूक करण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध होत नाही. चाळीसाठी दोन ते तीन लाख रुपये खर्च येतो. यामुळे सामान्य शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीसाठी कमी खर्चात कांदा जास्त टिकून राहावा, यासाठी नावीन्यपूर्ण लोखंडी तारेच्या गोलाकार चाळीत कांदा साठवणुकीला प्राधान्य दिले आहे. (smart technique for onion storage by farmer)

स्वस्त पर्याय; टिकवणक्षमता सात ते आठ महिने

तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली. कांदा काढणी सुरू असताना कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळीचे साहित्य मिळणे कठीण झाले होते. या वर्षी नगदी पीक म्हणून कांदाशेती मोठ्या प्रमाणात केली. उत्पादनामुळे अनेक शेतकऱ्यांनी प्रगती साधली असून, पुढील काळात बाजारभाव वाढेल व खरीप हंगामात शेतीला भांडवल उपलब्ध होईल, या आशेने उन्हाळ कांदा साठवणुकीवर भर दिला. कांदा साठवणुकीसाठी चाळीची सोय नसल्यास कांदा शेतातून काढल्यानंतर लगेच बाजारात विकण्याशिवाय पर्याय नसतो. यामुळे योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. याला पर्याय म्हणून शेतकरी अत्यल्प खर्चात कांदा साठवणुकीसाठी नवीन पद्धतीचा वापर करत कांदाचाळ तयार करत आहेत. या चाळीत हवा मोकळी जाते व कांदा टिकवणक्षमता वाढते. जागा कमी लागते. एका कांदाचाळीची उंची सहा फूट व रुंदी चार फूट असल्याने २५ ते ३० क्विंटल कांदा या चाळीत साठवता येतो. खर्च एक हजार ते पंधराशे रुपये येत असल्याने कमी खर्चात कमी जागेत व खोल फिटिंग असल्याने पुन्हा कांदाचाळीचा वापर करता येतो. कांदा गोलाकार पण भरला जातो. या कांदाचाळीची टिकवणक्षमता सात ते आठ महिने राहते.

smart storage system for onion
उन्हाळ कांदा खातोय भाव ! २५ ते ३०० रुपयांनी झाली वाढ

कमी किमतीत लाभदायी

कांदाचाळ बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च येत असल्याने हा खर्च सामान्य शेतकऱ्यांना परवडणारा आहे. गोलाकार लोखंडी तारेची कांदाचाळ तयार करून हजार ते पंधराशे रुपये खर्च येतो. चाळीत कांदा जास्त काळ टिकतो. चाळीचा पुन्हा वापर करता येतो. सोप्या पद्धतीची कांदा साठवणूक असल्याने कमी खर्चात ही चाळ छोट्या शेतकऱ्यांना लाभदायी आहे.

(smart technique for onion storage by farmer)

smart storage system for onion
९५ वर्षीय आजोबांची इच्छाशक्ती ठरली कुटुबीयांची प्रेरणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.