Nashik News : धावत्या नांदेड़- लोकमान्य टिळक एक्सप्रेसमधून निघाला धुर अन् प्रवाशांचा उडाला गोंधळ! मोठी हानी टळली

Nashik News
Nashik Newsesakal
Updated on

Nashik News: रेल्वेवरील नाशिक जिल्ह्यातील उगाव रेल्वे स्थानकाजवळ नाशिक येथून मनमाडच्या दिशेने निघालेली धावत्या लोकमान्य टिळक टर्मिनन्स-नांदेड एक्सप्रेसच्या एका डब्यातील खालील भागातून धूर निघू लागल्याने एकच गोंधळ उडाल्याने ही रेल्वे गाडी उगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली.

यावेळी बघितले असता चाकाला प्लास्टिकचा ब्रेक चिटकल्याने धूर निघत असल्याचे लक्षात आल्यावर ब्रेक दुरुस्त करत गाडी मनमाड च्या दिशेने रवाना झाली यावेळी मनमाड-मुंबई गोदावरी एक्सप्रेस उगाव रेल्वे स्थानकात थांबवण्यात आल्याने या गाडीतील चाकरमान्यांचे वेळेत कामावर पोचण्यासाठी हाल झाल्याचे चित्र पाहवयास मिळाले.

(Smoke came out of the running Nanded Lokmanya Tilak Express and passengers got confused major loss avoided Nashik News)

असा घडला थरार

गाडी क्रमांक 07428 नांदेड कुर्ला हॉलिडे एक्सप्रेस या गाडीच्या दोन बोग्यांचा खालून अचानक मोठ्या प्रमाणावर धावत्या गाडीतून धूर निघू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. भुगाव तालुका निफाड रेल्वे स्थानकात ही गाडी साखळी ओढून थांबवण्यात आली.

त्यानंतर रेल्वे कर्मचारी व जागृत प्रवाशांनी अग्निप्रतिरोधक यंत्रणा कार्यान्वित करून तब्बल 35 मिनिटानंतर ही गाडी नाशिक साठी मार्गस्थ झाली. दरम्यान गाडीतून धूर निघू लागल्यावर दोन ते तीन प्रवाशांनी धावत्या गाडीतून उड्या घेतल्याची माहिती हाती आली आहे.

मात्र याबाबत निश्चित माहिती मिळू शकली नाही. याबाबतची माहिती अशी की गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास नांदेड कुर्ला हॉलिडे स्पेशल ही गाडी नाशिकसाठी मार्गस्थ झाली, लासलगाव रेल्वे स्थानकातून ही गाडी निघाल्यानंतर या गाडीच्या इंजिन पासून पाचव्या आणि सहाव्या भोगीच्या खालून s3 आणि s4 या दोन भोगीतून मोठ्या प्रमाणावर खालील बाजूने धूर निघू लागला.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Nashik News
Traffic Survey Planning : मुंबई नाका चौकाचे शुक्रवारी ट्रॅफिक काऊंट!

सुरुवातीला प्रवाशांना डिझेल इंजिनचा दूर असावा असे वाटल्याने प्रवाशांनी दुर्लक्ष केले पण नंतर धुळ्याचे लोळ उठू लागले, त्यानंतर मात्र या गाडीच्या खालील बाजूने बोगी खालून मोठ्या प्रमाणावर धूर निघत असल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रवाशांनी तात्काळ गाडीची साखळी ओढली. एव्हाना गाडी उगाव रेल्वे स्थानकाजवळ पास पोचली होती.

गाडी चालकाला इशारा मिळाल्यानंतर त्याने तात्काळ उगाव रेल्वे स्थानकात ही गाडी थांबली, त्यानंतर धूर निघू लागल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी या दोन्ही बोगीतून पटापट खाली उतरण्याचा निर्णय घेतला.

तेव्हा ना जवळपास पाच ते मधील प्रवासी मराठा वर उभे होते रेल्वे प्रवासी आणि जागृत नागरिकांनी तात्काळ या दोन्ही बोगींचा ताबा घेतला आणि खालील बाजूने अग्निप्रतिरोधक यंत्रणा हरियाणवीस केली.

अग्निरोधक पावडर सोडण्यात आली त्यानंतर हा धूर आटोक्यात आला. बोगीच्या खाली असलेल्या लायनिंग वायर झाल्यामुळे हा धूर निघाल्याचे सांगण्यात येते. तब्बल पस्तीस मिनिटानंतर हा धूर संपला आणि गाडीने नाशिककडे प्रस्थान केले.

Nashik News
SAKAL Special : महासिर मासा राज्य मासा करण्यासाठी नाशिक मत्स्य विभागाचे Social Engineering

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()