Nashik Drugs Case: साऊंड स्पिकरमधून MD ड्रग्जची नाशिकमध्ये तस्करी! सोलापूरातील एमडीचे दुसरे गोदाम उद्‌ध्वस्त

Nashik Police Team Seized Drugs
Nashik Police Team Seized Drugsesakal
Updated on

Nashik Drugs Case : नाशिकमध्ये येणाऱ्या एमडी ड्रग्जची तस्करी कशातून केली जात होती, याची अखेर उकल करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. गेल्या आठवड्यात सनी पगारे व त्याच्या टोळीने सोलापूरातील मोहोळमध्ये थाटलेला कारखाना उदध्वस्त केला.

पोलिसांनी आता उत्तर सोलापूरातून एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी लागणार्या कच्चा मालाचे गोदाम शोधून उदध्वस्त केले आहे.

त्यामुळे सोलापूरातून नाशिकमध्ये येणारे एमडी ड्रग्ज हे साऊंड सिस्टिमच्या स्पिकरमध्ये लपवून तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. अगदी सिनेस्टाईल ही तस्करी सुरू होती. (Smuggling of MD drugs in Nashik through sound speakers Another godown of MD in Solapur destroyed Performance of Nashik Police Crime)

नाशिकरोडच्या सामनगाव येथे गणेश शर्मा याच्याकडून पोलिसांनी १२.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करीत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्याचा तपास करीत असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या हाती मोठे रॅकेट लागले. मुख्य संशयित सनी पगारे याच्यासह आठ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

तसेच, गेल्या २७ ऑक्टोबर रोजी सोलापूरातील मोहोळ एमआयडीसीत सनी पगारे याने मनोहर काळे याच्या मदतीने सुरू केलेला एमडी ड्रग्जचा कारखाना उदध्‌वस्त केला. पोलिसांनी सुमारे दहा कोटींचा साठाही जप्त केला.

या गुन्ह्याचा कसून तपास सुरू असताना गेल्या २ नोव्हेंबर रोजी वैजनाथ सुरेश हावळे (२७, रा. सोलापूर) यास पुण्यातून अटक केली. १२ वीचे शिक्षण घेतलेल्या हावळे हा कारखान्यात एमडी ड्रग्ज बनविण्याचे काम करायचा.

त्याच्या चौकशीतून उत्तर सोलापूरमधील कोंडी या गावात आणखी एक गोदाम संशयितांचे होते. या गोदामात एमडी ड्रग्जसाठी लागणारा कच्चा माल ठेवला जात असल्याचे समोर आले.

त्यानुसार शहर गुन्हेशाखा आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (ता.३) रात्री उत्तर सोलापूर गाठून सदरील गोदामावर छापा टाकून तब्बल ४० लाखांचा कच्चा माल व साहित्य जप्त केले.

सदरची कामगिरी आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, हेमंत फड, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार चंद्रकांत बागडे, अनिरुद्ध येवले, अप्पा पानवळ, राजू राठोड यांनी केली आहे.

Nashik Police Team Seized Drugs
Nashik MD Drug Case: एमडी प्रकरणातील काळेच्या पोलीस कोठडीत वाढ; अंमली पदार्थविरोधी पथके परराज्यात ठाण मांडून

साऊंड स्पीकरमधून तस्करी

एमडी ड्रग्ससाठी वापरण्यात येणार्या गोदामामध्ये पोलिसांना साऊंड सिस्टिमसाठी वापरण्यात येणारे स्पिकर्स सापडले. याच स्पीकरच बॉक्सच्या आतमध्ये एमडी ड्रग्ज लपवून ते नाशिकमध्ये सनी पगारे याच्याकडे पाठविले जात असल्याचे समोर आले आहे.

अगदी सिनेस्टाईल तस्करी पाहून पोलिसही अवाक्‌ झाले. या गोदामातून पोलिसांनी एमडी ड्रग्जसाठी लागणारे २२ लाखांचे रासायनिक द्रव्यचे ५ ड्रम, १७५ किलो क्रुड पावडर, एम ड्रायर मशिन, स्पीकर बॉक्स असे ४० लाखांचे कच्चा माल व साहित्य जप्त केले आहे.

सूत्रधार हाती लागेना

या गुन्ह्यात सनी पगारे मुख्य संशयित असला तरी, त्याला एमडी ड्रग्जसाठी आर्थिक फंडिंग व या व्यवसायाची पुरेपुर मदत करणारा मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या मागावर गेल्या आठवडाभरापासून पथके परराज्यात तळ ठोकून आहेत.

तोच सोलापूरातून सनीला स्पीकर बॉक्समधून एमडी ड्रग्जची तस्करी करीत असल्याचे पोलिस तपासातून समोर आलेले आहे.

"नाशिकमध्ये ड्रग्जचे रॅकेट चालविणारा सनी असला तरी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अद्याप हाती लागलेला नाही. या गुन्ह्याच्या तळापर्यंत लवकरच पोलीस पोहोचतील."

- विजय ढमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हेशाखा युनिट एक.

Nashik Police Team Seized Drugs
Nashik Drug Case: सोलापूरच्या कारखान्यात ड्रग्ज बनविणाऱ्यास पुण्यातून अटक; MD ड्रग्जप्रकरणात नाशिक गुन्हेशाखेची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.