सर्पदंश झालेल्या महिलेचा अंधश्रद्धेने घेतला बळी; उपचाराअभावी मृत्यू

Death
Death Sakal
Updated on

मूलवड (जि. नाशिक) : सर्पदंश झालेल्या येथील महिलेला वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. श्रीमती रमी नवसू बांगाड (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. आदिवासी भागातील लोक भगताच्या अंधश्रद्धेला बळी पडतात. त्यामुळे दवाखान्यात पोचण्यास उशीर होऊन ते आपला जीव गमावतात.

उपचाराअभावी मृत्यू

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशावर योग्य उपचार मिळतात. मात्र, केवळ दवाखान्यात पोचण्यास उशीर झाल्याने व ‘रेफर टू नाशिक’मुळे मृत्यू होतो. हरसूल (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे उपजिल्हा रुग्णालय असून, तेथे व्हेंटिलिटर किंवा ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्णांना नाशिकला पाठविले जाते. उशीर झाल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. या भागात अंधश्रद्धेची विषवल्ली फोफावत असताना, सर्पदंशाविषयी जनजागृतीची गरज आहे. लुळ्या पडलेल्या आरोग्य यंत्रणेला सुदृढ करण्याची गरज आहे. या भागात मण्यार, नाग व घोणस हे विषारी, तर नानट, धामण हे बिनविषारी साप मोठ्या प्रमाणात आढळतात.

Death
गांधील माशी चावल्याने पोलिसाचा मृत्यू; दिंडोरी पोलिस ठाण्यातील घटना

सर्पदंश झाल्यास घ्यावयाची काळजी

- विषारी सापाचा दंश झाल्यास दंश झालेल्या ठिकाणी दोन दातांचे दंश स्पष्ट दिसतात.

- बिनविषारी सापाचा दंश झाल्यास अर्धवर्तुळाकार दंश दिसतो, हे ओळखून तत्काळ दवाखान्यात न्यावे व उपचार करावेत.

- चावा घेतलेला साप विषारी असो की बिनविषारी, दंश झालेल्या ठिकाणापासून तीन-चार इंचावर आवळपट्टी बांधणे आवश्यक आहे.

- घरातील रिबीन, कपड्यांची पट्टी, लहान पक्की दोरी यापैकी कशाचाही आवळपट्टी म्हणून उपयोग करू शकतात. त्यामुळे शरीरात जाणारे विष रोखण्यात मदत होऊन उपचारासाठी पुरेसा वेळ मिळतो.

Death
नाशिक : डोक्यात दगड घालून शेतमजुराचा खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()