Nashik News : दुपारी शेतकरी, शेतमजूरांची विश्रांतीची वेळ...अन् अचानक सळसळत भला मोठा नाग...काही वेळातच कांदा चाळीत शिरला...लहान बालकाच्या नजरेत पडला कुटुंबातील सदस्यांनी चाळीकडे धाव घेतली बघता बघता नागोबाने भला मोठा फना काढत संपूर्ण चाळीचा ताबा घेतला.
त्याचे अवसान बघून कुणाचीही पुढे जाण्याची हिमंत होईना, अखेरीस सर्पमित्राला पाचारण करून सुरक्षित त्याच्या अधिवासात सोडल्याने कांदा उत्पादक शेतकरी कुटुंबियांनी निश्वास सोडला. (snake in onion chawl rescued by snake friend VIDEO at ambasan Nashik)
देवळाणे (ता.बागलाण) येथील शेतकरी महेंद्र काशिनाथ देवरे हे आपल्या कुटुंबासह पाटी शिवारातील (गट क्र.१६१) मध्ये राहतात. सकाळपासून देवरे कुटुंबिय शेतातील कामात व्यस्त होते.
दरम्यान दुपारच्या सत्रात विश्रांतीसाठी शेतातील घरात बसले असता महेंद्र देवरे यांचा दुसरीत शिक्षण घेत असलेला मुलगा घराजवळील ट्रॅक्टरवर खेळत होता.
अचानक त्याचे सळसळत जाणा-या भल्या मोठ्या सापाकडे लक्ष गेले व लागलीच कुटुंबातील सदस्यांना आवाज देऊन माहिती दिली. कुटुंबियांनी धाव घेतली तोच नागोबाने शेजारील कांदा चाळीत शिरकाव केला.
देवरे कुटुंबीयातील सदस्यांनी आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांना आवाज दिला तोपर्यंत नागोबाने कांदा चाळीचा ताबा घेतला होता. नागोबाचे रौद्र रूप पाहून एकाचीही हिमंत होत नव्हती जमलेल्या शेतकऱ्यांतील एकाने सर्पमित्राला पाचारण केले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
काही वेळातच सर्पमित्र दाखल झाले त्यांनी कांदा चाळीवरील फ्लाॅस्टिक कागद अलगद बाजूला केला आणि चाळीतील कांद्यावर डुलत असलेल्या नागोबाला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले.
अखेरीस सर्पमित्राने मोठी कार्यकुशलता दाखवत पकडण्यात यश मिळवले. सर्पमित्राने नागोबाला त्याच्या आदिवासात सुखरूप सोडले आणि देवरे कुटुंबीयांसह उपस्थित शेतक-यांनी निश्वास सोडला.
देवाचीच कृपा
...दोन दिवसांत याच चाळीतील कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी प्रतवारी करून नेणार होतो. सुदैवच म्हणावे लागेल आणि देवाचीच कृपा मुलाने नागोबाला पाहिले नाहितर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती असे महेंद्र देवरे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.