नाशिक : कोरोना महामारीच्या काळात (Corona epidemic) घरातील कर्त्या पालकांचे निधन झाल्याने त्यांच्या पाल्यांवर संकट कोसळले आहे. अशी मुले शिक्षणापासून दुरावू नये, याकरिता नाशिकमध्ये सामाजिक चळवळ उभी राहत आहे. अशा गरजू व्यक्तींनी संपर्क साधण्यास योग्य ती पडताळणी करून शिक्षणासाठी मदत केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Social movements will help the students who lost their parents during the Corona epidemic)
कोरोनाच्या आपत्तीत अनेक कुटुंबांचे होत्याचे नव्हते झाले आहे. पालकांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या मुलांवर संकट कोसळले आहे. पुढील आयुष्याचा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. अशा विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, पालक गमावलेले मुले आयुष्यात त्यांच्या पायावर उभी राहावी, या उद्देशाने अशा विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण होईपर्यंत शिक्षणासाठी आर्थिक मदत तसेच त्यांच्या योग्य वाटचालीसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, शैक्षणिक साहित्य व शिक्षणाकरिता येणारा इतर खर्च, शिक्षण पूर्ण होईपर्यंत दिला जाईल. वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले जाणार असल्याने ही मुले आयुष्यात स्वतःच्या पायावर उभी राहू शकतील, असा विश्र्वास प्राचार्य प्रशांत पाटील यांनी व्यक्त केला.
संपर्क साधण्याचे आवाहन
आई किंवा वडील गमावलेले व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांची नावे, पत्ता, संपर्कासाठी क्रमांक, तसेच जवळच्या तीन नातेवाइकांची नावे, पत्ते व संपर्क क्रमांक व ई-मेलद्वारे कळविण्याचे आवाहन केले आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी अशा विद्यार्थ्यांना सहाय्य करण्याची स्वीकृती दर्शवली असल्याचे नमूद केले आहे. यासंदर्भात प्राचार्य प्रशांत पाटील (९५४५४५३२३३) (patilprnnsk@rediffmail.com), हेमंत राठी (९८२२०६३७२६), मधुकर ब्राह्मणकर (९८२२०१६०१६) (mnb@eccipl.com) यांच्याशी संपर्क साधावा.
Social movements will help the students who lost their parents during the Corona epidemic)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.