Nashik News: सामाजिक संघटनांनी विझविले 19 वणवे! वनविभागाला सामाजिक संघटनांची साथ

Forest fire
Forest fireesakal
Updated on

Nashik News : उन्हाळ्यात जंगलांना आग लागून वणवा पेटण्याच्या घटनांमध्ये वर्षानुवर्षे वाढ होत असताना नाशिकमधील सामाजिक संघटनांनी वर्षभरात १९ वणवे विझविले आहेत. वनविभागाचे प्रयत्न कमी पडत असल्याने या संघटनांचा पर्यावरण संवर्धनाला हातभार लागला.

नाशिकमधील राह व गेव्ह फाउंडेशन हे वणवे विझविण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत. (Social organizations put out 19 fires Support of Social Organizations to Forest Department Nashik News)

यंदा मातोरी, सुळा डोंगर, गावठाण, किल्ले रामशेजला या ठिकाणी तीन वेळा आग लागली. उन्हाळ्यात आग लागण्याचे प्रमाण हे साधारणतः ८० टक्के असते. त्यामुळे या काळात वणव्यांबाबत फार सतर्क राहावे लागते. आग लागताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचतात.

पण त्यांच्या मदतीला सामाजिक संघटनांचे प्रतिनिधीही आता उतरले आहेत. गेव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून तुषार गायकवाड यांनी एक बोलेरो गाडी तयार केली आहे. आगीच्या ठिकाणी ही गाडी घेऊन जाण्यासाठी सदैव तयार असते.

त्यामुळे अनेक युवकांनी या गाडीच्या माध्यमातून मायना डोंगर, दरीमाता पर्यावरण क्षेत्र, गवळवाडी परिसर, हरसूल डोंगर पठार, रोहिले- कोणे येथील वनडोंगर, वणी रोडवरील वनक्षेत्र मायना, दरी डोंगर परिसर, जळके ब्राम्हणवाडे जंगल, गणेशगाव वाघेरा वनक्षेत्र, गिरणारे- धोंडेगाव डोंगर परिसर, पांडव लेणी वनक्षेत्र, संतोषा डोंगर, चाचडगाव डोंगर परिसराची आग विझविली.

वणव्यामुळे हजारो हेक्टरवरील दुर्मिळ वनक्षेत्र, वन्यजीव, पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पण या वणवा नुकसानीचे कधीच ऑडिट सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहचत नाही. पण वणवा रोखण्यासाठी अनेक निसर्गमित्र जीव धोक्यात घालून वनविभागासोबत काम करतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Forest fire
SAKAL Special: सर्वसमावेशक विचारातून नैराश्‍यासह चिंता करता येते दूर : नीलेश सुराणा

संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांना कुठलेही प्रशिक्षण दिले जात नाही. त्यासाठी वनविभागाने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे या संघटनांच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे. या कार्यात शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे राम खुर्दळ,

राह फाउंडेशनचे तुषार पिंगळे व टीम, झटका ऑर्गनायझेशनचे रोशन केदार, वृक्षवल्लीचे सागर शेलार व टीम, दरीमाता वृक्षमित्र परिवाराचे भारत पिंगळे व शिवाजी धोंडगे, राह फाउंडेशनचे सी. आर. पी., जितेंद्र साठे व टीम यांनी वणवे विझविण्यात बहुमूल्य योगदान दिले.

"आग लागल्यानंतर तत्काळ कुणीच येत नसल्याने वणवा पेटतो. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही एक गाडी खरेदी केली आहे. ती सर्वांना वापरण्यासाठी दिली जाते. या कार्यात बहुतांश सामाजिक संस्था व युवकांचा सहभाग आहे."

- रमेश अय्यर, गेव्ह फाउंडेशन

वणवा विझविणाऱ्या संस्था

* शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था,नाशिक

* वृक्षवल्ली फाउंडेशन,

* दरीमाता वृक्षमित्र परिवार

* झटका ऑर्गनायझेशन

* राह फाउंडेशन, नाशिक

* दत्तू ढगे व वृक्षमित्र परिवार

Forest fire
Onion Rates Hike: उन्हाळ कांद्याचे भाव चढ-उतारासह तेजीच्या दिशेने जाण्याची शक्यता!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.