Nashik : सूर्यग्रहणाचा मनमाडकरांनी अनुभवला अविष्कार; सन गॉगल्स, X- ray पेपरचा वापर

Balgopal watching the Khandgras solar eclipse.
Balgopal watching the Khandgras solar eclipse.esakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : दिवाळीच्या लक्ष्मीपूजनानंतर मंगळवारी (ता. २५) खंडग्रास सूर्यग्रहणाचा खगोलीय अविष्कार खगोलप्रेमींनी ‘याची देही याची डोळा’ अनुभवला. मनमाड शहरातील बालगोपाळ, ज्येष्ठ नागरिकांनी सन गॉगल व ‘एक्स-रे’च्या साहाय्याने सूर्यग्रहण बघितले. (solar eclipse experienced by Manmadkar Use of sun goggles Xray paper Nashik Latest Marathi News)

Balgopal watching the Khandgras solar eclipse.
Nashik : Electric Audit कागदावरच; Mahavitaran कंपनीकडून प्रतिसाद नाही

या वर्षीचे अखेरचे सूर्यग्रहण मंगळवारी अनुभवायला मिळाले. तब्‍बल २७ वर्षांनंतर दिवाळी सणात ग्रहणाचा योग आला. भारतातही सूर्यग्रहण दिसणार असल्याने मनमाड शहरासह परिसरातील खगोलप्रेमींनी सकाळपासून तयारी करून ठेवली होती. अनेकांनी ग्रहणासंदर्भात माहिती घेतली होती. मनमाड शहरात सायंकाळी पाचच्या सुमारास खंडग्रास सूर्यग्रहण दिसू लागले. सूर्यग्रहणाचे निरीक्षण करण्यासाठी बालगोपाळ, नागरिकांनी सन गॉगल्स, एक्स-रे पेपरचा वापर केला. आजही २१ व्या शतकात सूर्यग्रहणाबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा व गैरसमज आहेत.

याला फाटा देत प्रा. डॉ. रुपेश मोरे यांनी मुलांना विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी व सूर्यग्रहणाविषयी असणारे गैरसमज माहिती देऊन दूर करावे, असे आवाहन केले. प्रसिद्ध ग्रीक गणित तज्ज्ञांनी सूर्यग्रहणाच्या ज्ञानाचा वापर करून दोन राजांमधील सहा वर्षांपासून चाललेल्या युद्धास पूर्णविराम देण्यास कसा वापर केला, याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. बालगोपाळांनी सायंकाळी घराट्यात जात असलेले पक्षी व झाडांच्या सावलीचे निरीक्षणही केले.

Balgopal watching the Khandgras solar eclipse.
Nashik : गंभीर गुन्ह्याचा तपास रखडला; गुन्हे शाखेत पोलिस अधिकाऱ्यांची वाणवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.