Surya Grahan : लक्ष्मीपूजनाच्‍या पुढच्‍या दिवशी सूर्यग्रहण; 27 वर्षांनंतर दिवाळीत ग्रहण

Khandgras Surya Grahan 2022
Khandgras Surya Grahan 2022esakal
Updated on

नाशिक : यावर्षीचा दुसरा आणि अखेरचा सूर्यग्रहण २५ ऑक्‍टोबरला अनुभवायला मिळणार आहे. तब्‍बल सत्तावीस वर्षांनंतर दिवाळी सणाच्‍या दिवसांत ग्रहण आलेला आहे. २४ ऑक्‍टोबरला लक्ष्मीपूजन झाल्‍यानंतर पुढील दिवशी खग्रास सूर्यग्रहण हा खगोलीय आविष्कार अनुभवण्याची खगोलप्रेमींना संधी उपलब्‍ध असणार आहे. (Solar eclipse on day after Lakshmi Puja after 27 years in diwali Nashik Latest Marathi News)

यावर्षी एप्रिल महिन्‍यात सूर्यग्रहण अनुभवायला मिळाला होता. त्‍यानंतर आता यावर्षातील दुसरा व अखेरचा सूर्यग्रहण २५ ऑक्‍टोबरला अनुभवता येणार आहे. भारतात सूर्यग्रहणाची अनुभूती घेता येईल. असे असले तरी सध्या तरी शहरासह राज्‍यभरात पाऊस सुरु असल्‍याने ढगाळ वातावरण अडथळा ठरण्याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. आकाश मोकळे राहिल्‍यास २५ ऑक्‍टोबरला खगोलप्रेमींना खग्रास सूर्यग्रहण अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

तब्‍बल २७ वर्षांनंतर दिवाळीच्‍या सणादरम्‍यान ग्रहण आलेला असला तरी सणावर त्‍याचा काहीही प्रभाव नसल्‍याचे धर्मशास्‍त्रातील जाणकारांचे म्‍हणणे आहे. सामान्‍यतः दिवाळीच्‍या पुढील दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. परंतु यावर्षी सूर्यग्रहणामुळे २५ ऑक्‍टोबरऐवजी २६ ऑक्‍टोबरला गोवर्धन पूजा केली जाणार असल्‍याची माहिती जाणकारांनी दिली.

काळजी घेत सूर्यग्रहण बघावे

खगोलप्रेमींनी सूर्यग्रहणाची अनुभूती घेताना काळजी घेणे आवश्‍यक आहे. उघड्या डोळ्यांनी ग्रहण बघण्याचे टाळावे. त्‍याऐवजी डोळ्यांना इजा होणार नाही अशा स्वरूपाचा चष्मा, गॉगलचा आधार घेत या खगोलीय अविष्काराची अनुभूती घेता येईल.

Khandgras Surya Grahan 2022
Nashik : तुम्हीच सांगा जगायचे कसे?; 3 दिवसांच्या पावसानंतर रस्त्यावरील व्यावसायिकांचा प्रश्‍न

पहाटे चारपासून सुतक काळ

या खगोलीय गतिविधीशी धर्मशास्‍त्रदेखील जोडले गेले आहे. त्‍यानुसार ग्रहण काळात काही संहितांचे पालन करण्याचा उल्‍लेख केला जातो. सुतक हा त्‍याचाच एक भाग आहे. भारतात सूर्यग्रहण दुपारी चारच्‍या सुमारास दिसणार असल्‍याने त्‍याच्‍या बारा तास आधी पहाटे चारपासून सुतक काळ सुरु होणार आहे. छाया पहाटे ४ वाजून ४९ मिनिटे, स्‍पर्श दुपारी ४ वाजून ४९ मिनिटांनी असेल तर मोक्ष सायंकाळी सहा वाजून ८ मिनिटे असे असणार आहे.

या राशींवर असेल प्रभाव

ज्‍योतिषशास्‍त्रानुसार दिवाळीत येत असलेला हा सूर्यग्रहण तूळ राशीत होणार आहे. या राशीतील सूर्य दुर्बल मानला जात असल्‍याने ते अशुभ परिणाम देतात. पंचांगानुसार सूर्यग्रहणावेळी सूर्यासह चंद्र, शुक्र आणि केतू तूळ राशीत बसतील. यामुळे तूळ राशीमध्ये चतुर्ग्रही योगही तयार होणार आहे. याशिवाय राहुचाही या चार ग्रहांवर नजर असणार असल्‍याने सूर्यग्रहणाचे अशुभ परिणाम बहुतांश राशींवर पडतील. त्‍यातही मिथुन, तूळ आणि मकर राशीच्‍या लोकांवर विशेष प्रभाव राहील, असे ज्योतिषशास्‍त्रातील जाणकारांचे म्‍हणणे आहे.

Khandgras Surya Grahan 2022
Diwali Festival 2022 : यंदा भेटवस्तू खरेदीस दमदार प्रतिसाद!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.