Nashik News: शहरातील 87 शौचालयांवर सौरऊर्जा पॅनल

Solar Panel
Solar Panelesakal
Updated on

Nashik News : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम) जाहीर केला आहे. याअंतर्गत नाशिक शहरातील ८७ सार्वजनिक शौचालयांवर सौरऊर्जा पॅनल लावले जाणार आहे.

यातून एक ते तीन किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसविण्यासाठी स्थायी समितीने सोमवारी (ता. ११) एक कोटी ७३ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती विद्युत विभागाचे अध्यक्ष अभियंता उदय धर्माधिकारी यांनी दिली. (Solar panels on 87 toilets in city Nashik News)

प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एन-कॅप) जाहीर केला आहे. त्यात हवा प्रदूषण रोखणे व त्या माध्यमातून २०२४ पर्यंत देशभरातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे नियोजन आहे.

विकसनशील नाशिकमध्येदेखील प्रदूषणाची पातळी घसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने नाशिक शहराचा योजनेत समावेश केला आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला चाळीस कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे.

या अनुदानातून शहरातील ११३ सार्वजनिक शौचालयांवर सौरऊर्जा पॅनल बसविले जाणार आहेत. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने विद्युत विभागाला प्रस्ताव सादर केला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Solar Panel
Shravan Somvar: कपालेश्‍वरासह सोमेश्‍वरला दर्शनासाठी लोटली गर्दी! शेवटच्या श्रावणी सोमवारमुळे पहाटेपासून रांगा

त्यानुसार एक कोटी ७३ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. लवकरच पॅनल बसविण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती धर्माधिकारी यांनी दिली.

"घनकचरा व्यवस्थापन विभागाने विद्युत विभागाकडे प्रस्ताव देऊन ८७ सार्वजनिक शौचालयांवर सौरऊर्जा पॅनल बसवण्याची मागणी केली. त्याअनुषंगाने लवकरच सौरऊर्जा पॅनल बसविले जाणार असून, या माध्यमातून हवेचे प्रदूषण कमी होण्याबरोबरच वीजदेखील बचत होईल." - उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता, विद्युत विभाग, महापालिका.

Solar Panel
NMC Pest Control Contract: ‘दिग्विजय एंटरप्राइजेस’ला औषध फवारणी ठेका चर्चेविना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()