सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यातील चोंढी येथील गणेश सुखदेव गीते या जवानाचा गोदावरी कालव्यात बुडून मृत्यू झाला. घटनास्थळापासून जवळच अंतरावर राहणारे नितीन गीते नेहमीप्रमाणे शेतात काम करीत होते.
'अचानक त्यांना कालव्याजवळ शेळ्या चाररणाऱ्या मुरली माळी यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी कालव्याच्या दिशेने धाव घेतली.
कालव्यावर पोहचताच पुढील दृश्य बघून दम लागलेला असताना देखील आपल्या जीवाची पर्वा न करता थेट कालव्यात पाण्यात बुडत असणारे जवान गणेश आणि कस्तुरी यांच्या दिशेने उडी घेतली. (Soldier Missing case Nitin saved wife and song unfortunately could not save soldier Ganesh Gite nashik news)
पाण्याचा प्रवाह अतिशय जोरात असल्याने हा प्रवाह पार करून गणेश जवळ पोहोचताच गणेशाने नितीनच्या कमरेला एका हाताने धरले. दुसऱ्या हातात मुलगी कस्तुरी होती. आपल्या नाका तोंडात पाणी जात असताना देखील गणेश यांनी कस्तुरीला एकाच हाताने पाण्यात बुडू नये यासाठी जीवाची बाजी लावली.
नितीन गीते यांनी गणेश आणि कस्तुरीला पाण्याच्याकडेला ओढून आणत कस्तुरीला गणेशच्या हातून सोडवून घेत पाण्याच्या काठावर आलेले मुरली माळी यांच्या हाती सोपविले. याच वेळी गणेश यांनी नितीन गीते यांच्या कमरेला धरून ठेवलेला हात सोडला व ते पाण्यात वाहून गेले.
गणेशला पाण्यात शोधण्याचा प्रयत्न केला मात्र, पाण्याच्या वेगवान प्रवाहात ते वाहून गेल्याने त्यांना वाचविता न आल्याची सल प्रचंड वेदनादायी असल्याचे नितीन गीते यांनी भावना व्यक्त केल्या. भावनिक होऊन त्याला रडू कोसळले.
कालव्याच्या कडेला पाण्यात अभिराजला घेऊन उभ्या रूपाली यांना मदतीला धावून आलेल्या स्थानिक महिला, नागरिकांनी बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.१०) गणेशचा मृतदेह पाण्यात मिळून आला. त्यांचे कुटुंबीय, नातलग, मित्रपरिवार आणि गावाचे ग्रामस्थ शोकसागरात बुडाले. जवान गणेश यांच्या मागे आई विमल, वडील सुकदेव आणि भाऊ शिवाजी असा परिवार आहे.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
गणेश यांची सासरवाडी ही शेजारीच करंजी गावाची आहे. गणेश अतिशय मनमिळाऊ व अतिशय गरीब कुटुंबातील असल्याने त्याने अथक परिश्रम करून देशाच्या सुरक्षा बलात नोकरी मिळवली होती.
या नागरिकांनी केले मदत कार्य
रवींद्र गीते, विकास गीते, प्रवीण मोंढे, सूरज गीते, नीलेश गीते, जितेंद्र गीते (मेंढी) संदीप डोकफोडे (म्हाळसाकोरे), गोविंद तुपे (बेलू) या युवकांनी गुरुवारी रात्री दीडपर्यंत आणि आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सहापासूनच कालव्यातील पाण्यात उतरून जीवाची पर्वा न करता जवान गणेश गीते यांचा शोध घेतला. बचाव कार्यासाठी नाशिक चांदोरी मालेगाव येथील जवानांनी शोध मोहीम राबवली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.