Nashik News: घनकचरा विभागाचे घंटागाडी ठेकेदारासमोर लोटांगण! अटी, शर्तीचा भंग होवूनही 11 कोटींचा धनादेश

NMC Garbage Truck
NMC Garbage Truckesakal
Updated on

Nashik News : सातपूर व पंचवटी विभागात घनकचरा संकलित करणाऱ्या घंटागाडी ठेकेदाराने निविदेतील अटी व शर्तींचा भंग केल्यानंतर चार महिन्यांपासून रोखून धरलेली जवळपास अकरा कोटी रुपयांची देयके अदा करण्याची घाई घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण करणारी ठरली आहे.

देयके अदा करताना यापूर्वी नस्तीवर मारण्यात आलेले लाल शेरे निळ्या शेऱ्यांमध्ये रुपांतरीत करण्याची किमया देखील या विभागाच्या अधिकाऱ्यांनी करताना नियमांची पूर्तता झाल्यानंतरच देयके अदा केल्याचा अजब दावा केला आहे. (Solid waste department bell tower prostrates in front of contractor 11 crore check despite breach of terms conditions Nashik News)

महापालिकेच्या वतीने शहरात घनकचरा संकलित करण्यासाठी नव्याने ठेका देण्यात आला. निविदेतील अटी व शर्ती नुसार एक डिसेंबर पासून ३९६ नवीन घंटागाड्या सुरू करण्यात आल्याचा दावा सुरवातीला करण्यात आला.

परंतु, पंचवटी व सातपूर विभागात मात्र अटी व शर्तींचे उल्लंघन झाले. पंचवटी विभागात अडीच टनाच्या ४३ तर सहाशे किलो वजनाच्या तेरा घंटागाड्यांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे तर सातपूर विभागासाठी अडीच टनाच्या २६ तर सहाशे किलो वजनाच्या सहा घंटागाड्यांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे.

परंतु संबंधित ठेकेदारांनी अडीच टन वाहनांऐवजी ६०० किलो वजन क्षमतेच्या घंटागाड्या सुरू केल्या. अडीच टन वाहन नसेल तर प्रतिदिन दहा हजार रुपये दंड आहे. जीपीएस नसल्यास प्रतिदिन एक हजार रुपये दंड आहे. पॉइंट चुकल्यास पाच हजार रुपये दंड आहे.

असे असताना नियमांचा भंग करण्यात आला. घंटागाडीवर जीपीएस बसविणे, निश्चित केलेल्या स्थळानुसार घंटागाड्या चालविणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु अटी व शर्ती पाळल्या गेल्या नाही. त्यामुळे या भागात कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी ईनविरो इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचे देयके थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

NMC Garbage Truck
Ward Committee Chairman Election : भाजप-शिवसेना शिंदे गट आमनेसामने; ठाकरे गटाचा अर्जच नाही

परंतु मागील चार वर्षांपासून रोखून ठेवण्यात आलेले अकरा कोटी रुपयांचे देयके अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देयके रोखून धरताना नस्तीवर लाल शेरे मारण्यात आले होते परंतु ते लाल शेरे पुसून टाकण्याचे उद्योग सुरु झाल्याने प्रशासकीय राजवटी मध्ये घनकचरा विभागाचा कारभार संशयात सापडला आहे.

"संबंधित ठेकेदाराने पहिलेच देयके सादर केले आहे. वाहनांची तपासणी केल्यानंतरच देयके काढली जात आहे. घंटागाड्यांच्या वजनासंदर्भात नियम नाही."

- डॉ. कल्पना कुटे, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग.

NMC Garbage Truck
Nashik IT Raid : बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या धाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.