Nashik News: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, नंतर नोटिसा द्या; सुरत-चेन्नई भूसंपादनाबाबत आमदारांची मागणी

Surat Chennai Highway
Surat Chennai Highwayesakal
Updated on

Nashik News : सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय संबधितांना संपादनाच्या नोटिसा पाठवू नयेत, अशी मागणी करीत, जिल्ह्यातील आमदारांनी पुन्हा एकदा बाधित शेतकऱ्यांबरोबर बैठक घेण्याचा आग्रह धरला. (Solve farmers queries then issue notices MLA demand regarding Surat Chennai land acquisition Nashik News)

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सुरत-चेन्नई महामार्गाबाबत बैठक झाली. आमदार दिलीप बनकर व सरोज आहिरे उपस्थित होत्या. आमदार नरहरी झिरवाळ व ॲड. माणिकराव कोकाटे हे ऑनलाइन सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आमदारांचे म्हणणे ऐकून घेत, स्थानिक पातळीवरील प्रश्न येथेच सोडविले जातील. केंद्रीय प्रश्नाबाबत केंद्राकडे अहवाल पाठविण्याचे आश्वासन दिले.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी, नाशिक, निफाड, सिन्नरसह विविध तालुक्यांतून जाणाऱ्या या महामार्गासाठी संपादन प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या जात आहेत. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नसताना नोटिसा दिल्या जाऊ नयेत, अशी प्रमुख मागणी सर्वच आमदारांनी मांडली.

जिल्ह्यात समृद्धी महामार्गासाठी जसा मोबदला दिला गेला, त्या न्यायाने सुरत-चेन्नई महामार्गासाठी मोबदला दिला जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. ही बाब प्रशासनाने समजून घ्यावी.

मूल्यांकन आणि ग्रामस्थांच्या अडचणी ऐकून घ्याव्यात, अशी आमदारांची मागणी होती. आमदार आहिरे यांनी यापूर्वी यासंदर्भात निवेदन दिले आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेण्याचा आग्रह धरला.

आमदार झिरवाळ यांनी सुरत-चेन्नई महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जागा जाणार आहेत, त्यांच्या भावना लक्षात घेऊन बाधीत शेतकऱ्यांबरोबर बैठक घ्यावी. त्यांच्या अडचणी विचारात घ्याव्यात, अशी मागणी केली.

आमदार बनकर यांनी मोबदल्याचा मुद्दा मांडताना फळबागा असूनही हंगामी फळबागा दाखविल्या जात आहेत. शेतकरी जागा देत असताना त्यांच्या जागेचा मोबदला देताना त्यांना अडचणीत आणू नये, अशी मागणी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Surat Chennai Highway
New Education Policy: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावी अंमलबजावणीसाठी सुकाणू समिती : शिक्षणमंत्री अध्यक्ष

नाशिक आणि निफाड तालुक्यात जमिनीचा मोबदला देण्यात शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे मुद्दे आमदारांनी मांडले. जिल्ह्यातील ज्या भागात कामकाज सुरू झाले, तेथेही काही विषय पुढे आले.

सर्व्हिस रोडचा प्रश्न

- गावोगावी सर्व्हिस रोड वाढवा

- शक्य तेथे भुयारी मार्ग उभारा

- आधी बैठक घ्या, नंतर नोटिसा द्या

- मूल्यांकनाबाबत तक्रारी सोडवा

"जिल्हा स्तरावरील प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविले जातील. काही विषय केंद्र स्तरावरील आहेत. सुरत-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने काही तांत्रिक अडचणीच्या मुद्याबाबत शासनाला अहवाल पाठविला जाईल." - जलज शर्मा, जिल्हाधिकारी

Surat Chennai Highway
Nashik News: ZP सेसच्या नियोजनात समाजकल्याणची आघाडी! घरकुल, जोडप्यास अनुदानासह वाहन खरेदी योजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.