Inspirational News : शेतकरी तरुणाने भागविली नागरिकांची तहान! सोमनाथ अलगट यांचा आदर्श...

Officers here during the inauguration of water made available to citizens by Somnath Algat.
Officers here during the inauguration of water made available to citizens by Somnath Algat. esakal
Updated on

Inspirational News : राजापूर म्हणजे टंचाईचे माहेरघरच...सलग २५ वर्ष टॅंकरने पाणीपुरवठा होणाऱ्या या गावाला सध्या पाणी योजनेचा आधार आहे. मात्र, वाड्या वस्त्यांवर आजही टॅंकरनेच पाणीपुरवठा करावा लागतो. (Somnath Algat opened water in his farm to citizens nashik news)

उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी होणारी हाल पाहून अलगट वस्तीवरील आजूबाजूच्या नागरिकांना तरुण शेतकरी सोमनाथ अलगट यांनी आपल्या शेतातील पाणी खुले करून त्यांची तहान भागविली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे

राजापूर येथे नेहमीच पाणीटंचाई निर्माण होत असते. यातच आहेरवाडी रोडला असलेल्या अलगट वस्ती व परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. हे लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते व युवा शेतकरी सोमनाथ मुक्ताबा अलगट या तरुणाने स्वतःच्या विहिरीचे पाणी नागरिकांसाठी खुले केले आहे.

उन्हाळ्यात भाजीपाला बागायत न करता रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय केली असल्याने सोमनाथ व बंधू किशोर अलगट यांनी एक किलोमीटरची जलवाहिनी करून तेथील दहा ते बारा कुटुंबाची तहान भागवली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Officers here during the inauguration of water made available to citizens by Somnath Algat.
Nashik Wedding Gift : लग्नापेक्षा होत होती आहेराचीच चर्चा! मित्राच्या मुलीला दिला 'हा' अनोखा आहेर...

सध्या राजापूर पाणीटंचाई असून अलगट यांच्या विहिरीला व बोअरवेलला पाणी चांगले आहे. बागायत न करता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक घरापुढे नळ काढला असल्याने या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त नारळ फोडून तेथील रहिवाशांना कायम पाणीपुरवठा करू देऊ असे सोमनाथ अलगट यांनी सांगितले.

पोपट आव्हाड, सुभाष वाघ, दत्ता सानप, प्रकाश वाघ, अण्णासाहेब मुंडे, धनराज अलगट, प्रमोद बोडखे, लक्ष्मण घुगे, पी. के. आव्हाड, शंकर अलगट, भाऊसाहेब बैरागी, अनिल अलगट, निवृत्ती वाघ, धर्मराज अलगट, साईनाथ वाघ, सुनील अलगट, संजय वाघ, अनिल घुगे, दिलीप अलगट, विजय वाघ, सखाहरी अलगट आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

"वाड्या-वस्त्यावर पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना इकडेतिकडे भटकंती करावी लागते. माझ्या विहिरीच्या उपलब्ध पाण्यावर थोडेफार पीक निघाले असते, पण त्यापेक्षा या नागरिकांची तहान भागविणे मला महत्त्वाचे वाटल्याने हे पाणी उपलब्ध करून दिले आहे." - सोमनाथ अलगट, राजापूर.

Officers here during the inauguration of water made available to citizens by Somnath Algat.
Nashik Marathi School : शाळेची पटसंख्या टिकविताना दमछाक; विद्यार्थी शोधण्यात शिक्षक गर्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.