Nashik Crime News : अखेर रॉलेट गेमवर लाखो रुपये हरलेला सोमनाथ सापडला जालन्यात!

Strong action by Satpur police to find Somnath
Strong action by Satpur police to find Somnathesakal
Updated on

सातपूर (जि. नाशिक) : ऑनलाइन रॉलेट गेमच्या नादी लागून घरातील बांधकामासाठी जमवलेली रक्कम घेऊन घरातून पळून गेलेला त्या युवकाचा शोध घेण्यात अखेर सातपूर पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी त्या युवकाचे ब्रेन वॉश करत त्याला पालकांच्या स्वाधीन केले. (Somnath lost lakhs of rupees on roulette game finally been found in jalna Nashik Crime News)

श्रमिकनगर भागातील गुंठेवारी येथे सोमनाथ महादू सरोदे हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी कुटुंबासोबत राहतो. सोमनाथचे वडील बिगारी काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमनाथ ऑनलाइन रोलेट गेमच्या नादाला लागला आणि त्यात लाखो रुपये हरला.

त्यामुळे सोमनाथ नैराश्यात गेला होता. सोमनाथच्या वडिलांनी आपल्या घराच्या बांधकामासाठी कसेबसे सुमारे ७ लाख रुपयांची जमवाजमव केली होती. मात्र, रॉलेटच्या आहारी गेलेल्या सोमनाथने ते पैसे घेत घरातून पळ काढला.

ही बाब कुटुंबीयांच्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी नातेवाईकांकडून सोमनाथची शोधाशोध केली. अखेर सातपूर पोलिस ठाण्यात २१ जानेवारीला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी रॉलेट चालवणाऱ्या निखिल पाटील याच्यावर कारवाई करत सोमनाथचा शोध सुरू केला.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Strong action by Satpur police to find Somnath
NMC News : ड्रेनेजच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रे गतिमान करत सोमवारी (ता. ६) सोमनाथला जालन्यातून ताब्यात घेतले. सोमनाथचे मतपरिवर्तन करत वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी सरोदे कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

"परिसरात कुठेही अवैध धंदे किंवा ऑनलाइन रॉलेटसारखे गेम सुरू असल्यास त्यांनी त्वरित सातपूर पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. नैराश्यात कुणीही कुठलेही अनुचित पाऊल उचलू नये." - महेंद्र चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सातपूर

Strong action by Satpur police to find Somnath
Circus : कोरोनापूर्वी देशात होत्‍या 100 अन् आता उरल्‍या अवघ्या 5 सर्कस!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.