Kala Katta : मोबाईलच्या मायावी कैदेतून पडा बाहेर; पॉटरी कलेच्या प्रसारासाठी सोनाली पाटील यांचे समर्पण

pottery artist
pottery artistesakal
Updated on

कुंभारासारखा गुरू,

नाही रे जगात,

वरी घालितो धपाटा,

आत आधाराला हात ...

"सोनाली नेरकर यांच्या ‘हिंदास्वर’ प्रयोगशाळेत प्रवेश करताच, ग. दि. माडगूळकरांच्या या ओळी आठवतात. साध्या मातीच्या वस्तू, त्यात कला कशी बघावी, असे एखाद्याला वरकरणी वाटू शकते. परंतु, त्या कलाकृतींना स्पर्श केल्यावर ती कच्ची माती बोलू लागते आणि तिच्या सौंदर्याची जादू कळते." (Sonali Patil dedication to spread art of pottery nashik kala katta news)

"अमूर्ताला आलेले मूर्त रूप अनुभवताना, ते मूर्त घडविणाऱ्याचे उन्नत होत गेलेले सुंदर मन कळू लागते. निर्मितीच्या या प्रक्रियेत कलाकाराच्या संवेदनांना पालवी कशी फुटते, हा प्रवास सोनाली पाटील उलगडून सांगतात" - तृप्ती चावरे - तिजारे.

तन्मयता आणि माती हे दोन घटक. एक निर्गुण तर दुसरा सगुण, पण दोन्ही एकरूप झाल्यावर मन कसे घडत जाते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही मातीकला. जिला आजच्या आधुनिक भाषेत ‘पॉटरी’ असे नाव पडले. फिरते चाक, मातीचा गोळा आणि हाताचे वजन यातून जीवन संतुलित करायला शिकवणारी ही कला.

कलेच्या प्रसारासाठी सोनालीताई अनेक ठिकाणी माती घडवायच्या कार्यशाळा घेतात. त्यातून चक्क मोबाईल बाजूला ठेवून, प्रत्येक जण काहीतरी वेगळे घडविण्याचा तासनतास प्रयत्न करीत असतो. मोबाईलच्या कैदेत अडकलेली हाताची बोटे मातीच्या गोळ्यावर का फिरू नये, या साध्या प्रश्नातून सोनालीताईंनी मातीच्या गोळ्याशी नाते जोडले. कुंभाराच्या चाकाच्या जागी आधुनिक विज्ञान साधनांचा अंतर्भाव करता येईल का, यासाठी त्यांनी सिंगापूर येथे मातीकलेचे आधुनिक प्रशिक्षण घेतले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

pottery artist
SAKAL IMPACT : सिडको कार्यालयातील व्हीलचेअरची दुरुस्ती

कोलमडून टाकणाऱ्या परिस्थितीला सामोरे जात, ध्येयावरची नजर हटू न देता, स्वतः घडायचे आणि दुसऱ्याला घडवायचे हे पक्के होते. शिक्षण, क्रीडा, चित्रकला आणि रंगकला यात त्यांनी बरेच काम केले होते. कला, क्रीडा आणि मन यातील संवाद त्यांना खुणावत होता. कला शिकता शिकता कलाकारही घडला पाहिजे अशी कोणती कला आहे ? याचा शोध घेऊन त्यांनी भारतातही प्रशिक्षण घेतले.

हाती आलेला गोळा हा नुसता मातीचा गोळा नसून मन घडविणारा गुरू आहे हे त्यांच्या लक्षात आले. मायभूमीची ओढ आणि भारतीय कलांबद्दलची आस्था या दोन गोष्टी मुळे सोनालीताईंनी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आणि नाशिक येथे ‘हिंदास्वर’ माती साधना केंद्र सुरू केले.

बालक, पालकांचा ओढा वाढला. एकाच वेळी कलेला आणि मनाला वळण लागू लागले, काहीतरी निर्माण होऊ लागले, फुलू लागले. मातीच्या गोळ्याचा, हाताच्या बोटांशी अनोखा संवाद सुरू झाला आणि मातीशी खेळता खेळता एक अनोखे मानसशास्त्र हाती गवसू लागले.

pottery artist
Sanskrit Rajya Natya Spardha : संस्कृत राज्य नाट्यस्पर्धेची सांगता; 15 एकांकिकांचे सादरीकरण

नव्या पिढीसाठी एकाग्रतेचे वरदान

घडणे आणि बिघडणे यातले अंतर जाणणाऱ्या सोनालीताई अतिशय कल्पक पद्धतीने मुलांच्या मनात प्रवेश करतात आणि त्यांच्यातच दडलेलेल्या कलेचे दर्शन त्यांना घडवीत असतात. आजकाल कलेच्या बाबतीत हरवत चाललेली सौंदर्यदृष्टी त्या मातीच्या आधारे फुलवू पाहत आहेत.

मातीच्या गोळ्यातून नवनिर्मिती करताना मुले तल्लीन होतात, नकळतच ध्यानाच्या अवस्थेत जातात. यामुळे मन मोकळे तर होतेच, परंतु सद्गुणांची निर्मिती होऊ लागते. मुलांच्या मनोविश्वात प्रवेश करणारा हा अनोखा प्रयोग मातृत्व आणि कला यांचा अगदी जवळून संबंध आहे हे पटवून देणारा आहे.

मातीशी खेळता खेळता, मन घडविणारी सोनाली पाटील यांची ही अनोखी मातीची प्रयोगशाळा म्हणजे, संवेदना हरवत चाललेल्या आजच्या नव्या पिढीसाठी एकाग्रतेचे वरदान ठरेल यात शंका नाही.

pottery artist
Nashik News : आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि मुंबई IITत सामंजस्य करार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()